rohit sahrma hardik pandya yandex
Sports

Hardik Pandya: हार्दिक पंड्याला मोठा धक्का! Champions Trophy आधी BCCI मोठा निर्णय घेणार?

Team India Vice Captain For ICC Champions Trophy: येत्या १९ फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे .

Ankush Dhavre

भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियनम्स ट्रॉफीची तयारी सुरु केली आहे. ही स्पर्धा होण्यापूर्वी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये मर्यादीत षटकांची मालिका रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे.

मात्र टी-२० मालिका इतकी महत्वाची नसेल, कारण भारतीय संघाचं संपूर्ण लक्ष वनडे मालिकेवर असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात कोणाला संधी द्यायची हे, या मालिकेतील कामगिरीवरुन ठरणार आहे. या स्पर्धेपूर्वी एक बातमी समोर येत आहे.

केव्हा होणार संघाची घोषणा?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. या स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. येत्या १२ जानेवारीपर्यंत भारतीय संघाला आपल्या स्क्वाडची घोषणा करावी लागणार आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारीपर्यंत सर्व संघांना बदल करता येणार आहेत.

त्यामुळे १२ जानेवारीपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणारा भारतीय संघ कन्फर्म होईल. या स्पर्धेतही कर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येईल. संघाचा उपकर्णधार कोण असेल? हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा केला जातोय की, जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

हार्दिकला धक्का बसणार?

हार्दिक पंड्याकडे टी-२० संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. ज्यावेळी रोहितने टी-२० संघाचं कर्णधारपद सोडलं, त्यावेळी कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याचं नाव आघाडीवर आहे. मात्र कर्णधारपदी सूर्यकुमार यादवची वर्णी लागली.

हा हार्दिक पंड्याला मोठा धक्का होता. आता वनडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी जर जसप्रीत बुमराहकडे सोपवली गेली, तर हा हार्दिकसाठी दुसरा मोठा धक्का असेल. सध्या हार्दिकच्या नावाची चर्चा होत नसून बुमराहचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे वनडे संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह होणार, हे जवळजवळ निश्चित झालं आहे.

भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे आहे. रोहितच्या अनुपस्थितीत तो संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराह नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने शानदार विजय मिळवला होता. मात्र शेवटच्या कसोटीदरम्यान बुमराह दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो फिट होऊन परतणार का?हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT