Mohammad Shami Ruled Out From Indian Premier League (IPL 2024) yandex
Sports

Mohammed Shami Ruled Out: गुजरात टायटन्सला मोठा धक्का! मोहम्मद शमी IPL 2024 स्पर्धेतून बाहेर

Mohammad Shami Ruled Out From IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धा तोंडावर असताना शमीच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे

Ankush Dhavre

Mohammed Shami Ruled Out From IPL 2024:

भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी हा वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. या स्पर्धेत त्याने कमी सामने खेळून सर्वाधिक गडी बाद केले होते. मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर त्याला दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं आह

आता शमीच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार मोहम्मद शमी आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मोहम्मद शमी आयपीएल स्पर्धेतून बाहेर होणं हा गुजरात टायटन्स आणि भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे.

आयपीएल २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी...

मोहम्मद शमी हा गुजरात टायटन्स संघातील प्रमुख गोलंदाज आहे. गेल्या हंगामात गुजरातला स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहचवण्यात शमीने मोलाची भूमिका बजावली होती. त्याने या हंगामातातील १८ सामन्यांमध्ये १८.६१ च्या सरासरीने २८ गडी बाद केले होते.

बीसीसीआयच्या एका सुत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटले की, ' पायाच्या दुखापतीमुळे मोहम्मद शमी आयपीएल स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याला शस्त्रक्रियेची गरज आहे. ही शस्त्रक्रिया युकेमध्ये होणार आहे.' (Cricket news in marathi)

गुजरातचा मॅचविनर गोलंदाज..

शमी हा गुजरात टायटन्स संघाचा मॅचविनर गोलंदाज आहे. त्यामुळे त्याचं स्पर्धेतून बाहेर होणं हा गुजरात टायटन्ससाठी तगडा झटका असणार आहे. २०२२ मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सने त्याला ६.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. त्याच्या या स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ११० सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना २६.८६ च्या सरासरीने १२७ गडी बाद केले आहेत.

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी..

शमीने २०२३ वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. या स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये त्याने १०.७१ च्या सरासरीने २४ गडी बाद केले होते. मुख्य बाब म्हणजे त्याला या स्पर्धेतील सुरुवातीच्या ४ सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र जेव्हा त्याला संधी मिळाली त्याने संधीचं सोनं करुन दाखवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

SCROLL FOR NEXT