australia saam tv
Sports

Cricketers Retirement: चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू असताना ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

Australian Cricketer Jason Behrendorff Announced Retirement: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

पाकिस्तानात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसले आहेत. संघातील प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले. तर काही खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली. खेळाडूंचं निवृत्ती घेण्याचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. आता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात असताना आणखी एका गोलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने स्टेट क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तो टी २० लीग स्पर्धा खेळताना दिसून येऊ शकतो.

स्टेट क्रिकेटला रामराम करणारा जेसनने स्टेट क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तो राष्ट्रीय संघासाठी होणाऱ्या सिलेक्शनसाठी उपलब्ध असेल. त्याच्या टी २० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याला १७ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यासह २०१९ पासून ते २०२२ पर्यंत त्याला १२ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.

स्टेट क्रिकेटला रामराम केल्यानंतर काय म्हणाला?

जेसन बेहरेनडॉर्फने स्टेट क्रिकेटला रामराम केल्यानंतर म्हटले, ‘ आता माझ्या कारकिर्दीचा एक टप्पा संपला आहे. हे १६ वर्ष अविस्मरणीय होते. स्टेट क्रिकेट खेळून मी माझ्या बालपणीचं स्वप्न जगलो आहे. त्यामुळेच मला राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. त्याने स्टेट क्रिकेटमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाचं प्रतिनिधित्व केलं. त्याला वयाच्या १९ व्या वर्षी या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया संघासाठी पदार्पण केलं.

जेसनने भारतीय दौऱ्यावरही दमदार कामगिरी केली होती. त्याने भारतात टी २० मालिका खेळताना टॉप ऑर्डरला चांगलाच सुरुंग लावला होता. त्याने गोलंदाजी करताना रोहित – विराटसह ४ फलंदाजांना बाद केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Festival 2025: नवरात्र 2025 कधी आहे? तारीख, मुहूर्त आणि पूजा माहिती

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी डावललं, कोळी बांधवांचा आरोप; मंडळाकडून मोठं वक्तव्य, सांगितलं...

Shocking : १५ दिवसांच्या मुलाला फ्रिजरमध्ये ठेवून आई झोपी गेली; महिलेच्या कृत्याने खळबळ

Crime News: अनैतिक संबंधात नवरा अडसर बनला, घराजवळच मृतदेह गाडला, चित्रपटापेक्षा भयानक घटना

Accident News : गावी परतताना काळाचा घाला; बसची मोटारसायकलला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT