
महाराष्ट्रात नुकताच गणेशोत्सव पार पडला. आता नवरात्र उत्सव येत्या 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या सणाची सगळी तरुण मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात. 1 ऑक्टोबरपर्यंत देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. दहा दिवसांचा हा उत्सव देवी दुर्गेच्या नऊ रूपांच्या उपासनेसाठी ओळखला जातो. महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली अशा राज्यांमध्ये नवरात्राची विशेष धूम पाहायला मिळते.
नवरात्राची तारिख आणि शुभ मुहूर्त
हिंदू दिनदर्शिकेनुसार नवरात्राचा मुहूर्त अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील प्रतिपदा तिथी २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजून २३ मिनिटांनी सुरु होणार आहे. तर २३ सप्टेंबर रोजी २ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होणार आहे. ही वेळ घटस्थानेसाठी महत्वाची असणार आहे.
नवरात्र म्हणजे भक्तिभाव, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक एकोपा यांचं अनोखं मिश्रण आहे. देवीच्या मूर्तींची भव्य आरास, फुलं व दिव्यांच्या रोषणाईने मंदिरं आणि घरे उजळून निघतात. महाराष्ट्रात देवीच्या मांडवात खास भजनी मंडळं आणि जागरणं होत असतात, तर गुजरातमध्ये गरबा आणि दांडियाच्या तालावर लोक रात्रभर थिरकत असतात.
या सणात उपवासाची परंपरा मोठ्या प्रमाणावर पाळली जाते. उपवासादरम्यान लोक हलकं व पौष्टिक अन्न खातात. साबुदाणा खिचडी, राजगिरा पराठा, शेंगदाण्याचे लाडू, फराळाचे बटाटेवडे यासारख्या पारंपरिक रेसिपींना विशेष मागणी असते. यावर्षी हेल्दी लाइफस्टाईलची लाट असल्यामुळे उपवासासाठी मिलेट बेस्ड डिशेस आणि शुगर फ्री मिठाई या नव्या ट्रेंड्सकडेही लोकांचा कल वाढताना दिसतो.
फॅशनच्या दुनियेत नवरात्रात रंगीबेरंगी कपड्यांना, चनिया-चोळी, लेहेंगा-चुन्नी, तसेच पारंपरिक साड्यांना विशेष महत्त्व असतं. नऊ दिवस नऊ रंगांच्या कपड्यांचा ट्रेंड महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. याशिवाय तरुणाई फ्यूजन स्टाईलमध्ये इंडो-वेस्टर्न ड्रेस निवडताना दिसते.
नवरात्राचा समारोप 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीने म्हणजेच दसऱ्याने होईल. या दिवशी रावण दहन, शस्त्रपूजा आणि स्नेहभोजनाचे कार्यक्रम देशभरात साजरे केले जातील. नवरात्र उत्सव हा फक्त धार्मिक विधींचा सण नसून तो समाजातील एकात्मता, सांस्कृतिक परंपरा आणि आधुनिक ट्रेंड्स यांचं सुंदर प्रतीक आहे. त्यामुळे हा दहा दिवसांचा उत्सव सर्व वयोगटातील लोकांसाठी आनंद, श्रद्धा आणि उत्साह घेऊन येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.