Sakshi Sunil Jadhav
तुमच्या छातीत जर टोचल्यासारखे, जळजळ किंवा ताण जाणवत असले तर ते साधे दुखणे मानले जाते.
जर तुम्हाला छातीत दाबल्यासारखा, जडपणा, घट्ट पकडल्यासारखा वेदना जाणवत असतील तर हृदयविकाराचा धोका असु शकतो.
जर साधे दुखणे असेल तर काही सेकंदांपासून काही मिनिटांत कमी होते. मात्र ५ मिनिटांपेक्षा जास्त काळ दुखले तर तो हृदयविकाराचा धोका असू शकतो.
छातीच्या एखाद्या छोट्या भागात केंद्रित करुन दुखले असेल तर हे साधे दुखणे असते. हृदयविकारात डाव्या बाजूला सुरू होऊन खांदा, मान, हात, पाठ किंवा जबड्यापर्यंत पसरतो.
साध्या दुखण्यात हालचाल, वाकणे, श्वास घेणे यामुळे दुखणे बदलते. हृदयविकारात हालचालीने विशेष फरक पडत नाही.
साध्या दुखण्यामध्ये दम लागणे, घाम येणे क्वचितच अशा समस्या जाणवतात. हृदयविकारात घाम फुटणे, श्वास लागणे, मळमळ, चक्कर येणे ही लक्षणे एकत्र दिसतात.
साध्या दुखण्यामध्ये कोणत्याही वयात तणाव, गॅस, स्नायू ताण यामुळे होऊ शकते.
हृदयविकारात जास्त वय, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, धूम्रपान करणारे लोक यात अधिक धोका.