Big Bash League: इंग्लिश खेळाडूंना ईसीबीचा ‘बुलावा’ - Saam TV
Sports

Big Bash League: इंग्लिश खेळाडूंना ईसीबीचा ‘बुलावा’

सध्या ‘बिग बॅश लीग’मध्ये विशेषतः ‘मेलबर्न स्टार्स’ संघामध्ये कोरोनाची अनेक प्रकरणे आढळून आली आहेत, ज्यात त्यांच्या खेळाडू व सपोर्ट स्टाफमध्ये एकूण १८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

वृत्तसंस्था

सिडनीः इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने (ईसीबी) ऑस्ट्रेलियातील ‘बिग बॅश लीग’मध्ये (बीबीएल) भाग घेत असलेल्या आपल्या क्रिकेटपटूंना (Cricket) शक्य तितक्या लवकर देश सोडून माघारी परतण्याचे आदेश दिले आहेत. (Big Bash League ECB Calls Cricket Playesr Back)

ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) सातत्याने वाढत असलेली कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या आणि इंग्लंडचा वेस्ट इंडीजविरुद्धचा २२ जानेवारीपासून ब्रिजटाऊन येथे सुरू होणारा मर्यादित षटकांचा दौरा वाचवायचा असल्याने ईसीबीने या सूचना दिल्या असल्याची माहिती मिळत आहे.

इंग्लंड ब्रिजटाऊन येथे पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे, त्यानंतर त्यांची मार्चमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका नियोजित आहे.सध्या ‘बिग बॅश लीग’मध्ये विशेषतः ‘मेलबर्न स्टार्स’ संघामध्ये कोरोनाची अनेक प्रकरणे आढळून आली आहेत, ज्यात त्यांच्या खेळाडू व सपोर्ट स्टाफमध्ये एकूण १८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

‘‘ब्रिटनला परतण्यास सांगितले गेलेल्या खेळाडूंमध्ये कसोटी संघासाठी राखीव खेळाडू असणाऱ्या साकिब महमूद, जॉर्ज गार्टन, रीस टोपली, सॅम बिलिंग्ज, जेम्स विन्स आणि टायमल मिल्स यांचा सामावेश आहे.’’ असे एका स्थानिक क्रीडा वृत्तवाहिनीने म्हटले आहे. परतणाऱ्या सर्व खेळाडूंना मायदेशात परतल्यानंतर काही दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT