Bhuvneshwar Kumar Batting saam tv
Sports

Bhuvneshwar Kumar News: संघात निवड न होताच तळपली भुवीची बॅट! षटकारांचा पाऊस पाडल्याचा VIDEO होतोय व्हायरल

Bhuvneshwar Kumar Six Video: भारतीय संघात निवड न झालेल्या भुवनेश्वर कुमारची बॅट चांगलीच तळपली आहे.

Ankush Dhavre

Bhuvneshwar Kumar Viral Six Video:

आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाची घोषणा होताच क्रिकेट चाहत्यांचे हार्टब्रेक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण या संघातून काही वरिष्ठ खेळाडूंना दुर्लक्ष करण्यात आले आहे.

ज्यात शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमारसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. संघाबाहेर असलेला भुवनेश्वर कुमार सध्या युपी टी-२० लीग स्पर्धेत नोएडा सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतोय. या स्पर्धेत अप्रतिम गोलंदाजीसह तो फलंदाजीत तुफान फटकेबाजी देखील करताना दिसून आला आहे.

या स्पर्धतील १२ वा सामना नोएडा सुपर किंग्स आणि मेरठ मावेरिक्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या फलंदाजीची जादु पाहायला मिळाली आहे. भुवनेश्वर कुमार २० व्या षटकात फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने या षटकातील पहिल्याच चेंडूवर लाँग ऑनच्या वरून षटकार मारला.

पुढच्या चेंडूवर त्याने धावून २ धावा पूर्ण केल्या.तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईकवर आलेल्या भूवीने पुन्हा एकदा जोरदार बॅट फिरवली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहचवला. या डावात त्याने आपल्या संघासाठी ४ चेंडूंमध्ये १४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

वर्ल्डकप संघात नाही मिळालं स्थान..

एकेकाळी संघातील प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुवनेश्वर कुमारला आगामी वनडे वर्ल्डकपसाठी संघात स्थान मिळालेलं नाही.

त्यामुळे क्रिकेट चाहते निराश झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भुवनेश्वर कुमार हा गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. त्याच्या जागी आता मोहम्मद सिराज,मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. (Latest sports updates)

आगामी वनडे वर्ल्डकपसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा( कर्णधार), शुबमन गिल,विराट कोहली ,श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : फ्रीवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Thakrey Brothers Vijayi Melava : अखेर तो क्षण आलाच! राज-उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहून महिलेला अश्रू अनावर; पाहा VIDEO

Ashadhi Ekadashi : नागपूरच्या वारकऱ्याला पंढरीत दर्शन रांगेत काठीने मारहाण, सुरक्षारक्षकाची मुजोरी

Morning Tips: अंथरूणातून उठल्यानंतर या सवयी पाळा, भविष्यात होईल फायदा

WTC Points Table: भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा भारत कोणत्या स्थानावर?

SCROLL FOR NEXT