sarfaraz khan twitter
Sports

Sarfaraz Khan: 'भैय्या भरोसा रखो...' सरफराजच्या खास मागणीवर रोहितने DRS घेतला, अन्...- VIDEO

India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेटच्या मैदानावर सुरु आहे. पहिला सामना गमावलेला भारतीय संघ या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे.

त्यामुळे हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान न्यूझीलंडला सुरुवातीलाच २ मोठे धक्के बसले आहेत .

अश्विनच्या गोलंदाजीवर यंग बाद

तर झाले असे की, न्यूझीलंड संघाची पहिल्या डावातील फलंदाजी सुरु असताना आर अश्विन गोलंदाजीला आला होता. अश्विन २४ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. त्यावेळी विल यंग स्ट्राईकवर होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर विल यंग स्ट्राईकवर होता. त्यावेळी त्यावेळी अश्विनच्या ओव्हर द विकेटचा मारा करत मिडल स्टम्पच्या लाईनवर चेंडू टाकला. जो टप्पा पडून लेग साईडच्या बाहेर गेला.

अश्विनच्या चेंडू टप्पा पडून जरा जास्तच फिरला. त्यामुळे फलंदाजाने थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला. चेंडू रिषभ पंतच्या हातात गेल्यानंतर आर अश्विनने जोरदार अपील केली.

मात्र चेंडू बॅटला लागलाय की नाही, हे रिषभला कळालं नव्हतं. अंपायरने अश्विनची मागणी फेटाळून लावली. रोहितने रिषभ आणि अश्विनला विचारलं, मात्र त्या दोघांनीही खात्री नव्हती. त्यावेळी सरफराजने रोहितला खात्री पटवून दिली. 'रोहित भाई माझ्यावर विश्वास ठेवा..चेंडू लागून गेलाय..' सरफराजच्या बोलण्यावर रोहितने विश्वास ठेवला. DRS मध्ये पाहिलं असता, चेंडू बॅटला लागून गेल्याचं दिसून आलं. विल यंगला ४५ चेंडूत १८ धावा करुन माघारी परतावं लागलं.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत ( यष्टीरक्षक), सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, रविंद्र जडेजा, आर अश्विन

न्यूझीलंड - टॉम लेथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, विल यंग, रचिन रविंद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साऊदी, एजाज पटेल, विलियम ओ'रूर्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT