ben stokes twitter
क्रीडा

Ben Stokes: राजकोट कसोटी बेन स्टोक्ससाठी ठरणार ऐतिहासिक! मैदानात उतरताच रचणार इतिहास

Ankush Dhavre

Ben Stokes 100th Test News:

देशासाठी कसोटी क्रिकेट खेळणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. कसोटी संघात स्थान मिळवल्यानंतर स्थान टिकवून ठेवणं हे मोठं आव्हान असतं. दरम्यान इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा तिसरा कसोटी सामना हा बेन स्टोक्सच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे.

बेन स्टोक्स खेळणार १०० वा कसोटी सामना..

बेन स्टोक्सने इंग्लंड संघासाठी ९९ कसोटी सामने खेळले आहेत. १५ फेब्रुवारी होणारा कसोटी सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना असेल. या ऐतिहासिक सामन्यापूर्वी बोलताना बेन स्टोक्स म्हणाला की, ' १०० कसोटी सामने खेळणं मैलाचा दगड आहे. याहुन मोठं दुसरं काहीच असू शकत नाही. १०० हा एक आकडा आहे. माझ्यासाठी प्रत्येक सामना खेळणं हे तितकंच महत्वाचं असतं. १०० व्या कसोटी सामन्यानंतर पुढे १०१ वा सामना असणार आहे. ९९,१०० किंवा १०१ या आकड्यांनी फारसा फरक पडत नाही.' (Cricket news in marathi)

बेन स्टोक्सबद्दल बोलायचं झालं तर, २०१३ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या सामन्यात त्याला १ तर दुसऱ्या डावात २८ धावा करता आल्या होत्या. पहिल्या कसोटीत फ्लॉप ठरल्यानंतर त्याने दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात १८ आणि दुसऱ्या डावात १२० धावांची शानदार खेळी केली होती.

असा राहिलाय रेकॉर्ड..

बेन स्टोक्सने आतापर्यंत खेळलेल्या ९९ कसोटी सामन्यातील १७९ डावात ५९.३१ च्या सरासरीने ६२५१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १३ शतक आणि ३१ अर्धशतकं झळकावली आहेत. फलंदाजीसह गोलंदाजीतही त्याचा दबदबा पाहायला मिळाला आहे. त्याने गोलंदाजी करताना १९७ गडी बाद केले आहेत. तो आपल्या १०० व्या सामन्यात २०० गडी बाद करण्याचा कारनामा करु शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT