World Cup 2023, India Vs England/Social Media SAAM TV
क्रीडा

World Cup : भारत-इंग्लंड सामन्याआधी धक्कादायक वृत्त; स्टार खेळाडूच्या त्या फोटोनं टेन्शन वाढवलं

Nandkumar Joshi

India Vs England :

गतविजेता इंग्लंडचा संघ यंदाच्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत साजेशी कामगिरी करताना दिसत नाही. चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलंय. अशीच कामगिरी राहिली तर, सेमिफायनलच्या शर्यतीतून सर्वात आधी बाहेर पडणारा संघ म्हणून इंग्लंडवर नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे. आज श्रीलंकेविरुद्धचा सामना इंग्लंडसाठी महत्वाचा असताना, एक धक्कादायक वृत्त येऊन धडकलं आहे. संघाचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो टीम इंग्लंडची चिंता वाढवणारा आहे.

बेंगळुरूत होणाऱ्या सामन्याआधी इंग्लंडच्या संघानं सराव सत्रात भाग घेतला. या सत्रात मैदानात उतरलेला बेन स्टोक्स हा इनहेलरचा वापर करताना दिसला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होत आहे. इनहेलरचा वापर सर्वसाधारणपणे अस्थमाचे रुग्ण करत असतात. अशात स्टोक्सचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं असून, स्टोक्स पूर्णपणे तंदुरुस्त नसणं ही इंग्लंडसाठी चिंता वाढवणारी बाब आहे.

(सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

बेन स्टोक्स वर्ल्डकपमधील सुरुवातीच्या तीन सामन्यांत खेळू शकला नव्हता. २१ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झालेल्या सामन्यात स्टोक्सनं प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री केली. पण त्यात त्याने एकही षटक टाकलं नाही. तसंच अवघ्या पाच धावा तो करू शकला. (Latest sports updates)

१४ महिन्यांनी कमबॅक

बेन स्टोक्सने मागील वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तो जवळपास १४ महिने वनडे क्रिकेटपासून दूर होता. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरच्या सांगण्यावरून स्टोक्सनं वनडे क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. वर्ल्डकपच्या आधी तो न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळला. पण वर्ल्डकपला काही दिवस शिल्लक असतानाच, त्याला दुखापतीनं गाठलं आणि सुरुवातीचे तीन सामने खेळता आले नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT