ben stokes twitter
Sports

IND vs ENG,1st Test: बेन स्टोक्सने पहिल्याच दिवशी केलेली ही मोठी चूक इंग्लंडला महागात पडणार

India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्याच दिवशी बेन स्टोक्सने मोठी चूक केली आहे.

Ankush Dhavre

Ben Stokes Mistake:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरू आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असलेले भारतीय खेळाडू इंग्लंडवर भारी पडले आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. यादरम्यान कर्णधार बेन स्टोक्सने एक मोठी चूक केली आहे. जी इंग्लंडला महागात पडू शकते.

तर झाले असे की, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने पहिल्याच दिवशी तिन्ही डीआरएसचा वापर केला आहे. मुख्य बाब म्हणजे भारताचा केवळ १ फलंदाज बाद होऊन माघारी परतला आहे. त्यामुळे आता इंग्लंडला पुढील ९ फलंदाजांना बाद करण्यासाठी एकही डीआरएस उपलब्ध नसेल. हे मुळीच सोपं नसेल.

तिन्ही डीआरएस व्यर्थ..

यशस्वी जयस्वालला बाद करण्यासाठी बेन स्टोक्सने डीआरएसचा वापर केला. त्यावेळी पहिल्या डावातील तिसरे षटक सुरू होते. डीआरएस घेतल्यानंतर तो नॉट आउट असल्याचं दिसून आलं.

त्यानंतर १२ व्या षटकात बेन स्टोक्सने डीआरएसची मागणी केली. त्यावेळी टॉम हार्टली गोलंदाजी करत होता. तर रोहित शर्मा फलंदाजी करत होता. त्याने रोहित झेल बाद आहे की नाही हे पाहण्यासाठी डीआरएसची मागणी केली होती. (Cricket News In Marathi)

दोन षटकानंतर म्हणजेच १४ व्या षटकात बेन स्टोक्सने पुन्हा एकदा डीआरएसची मागणी केली. यावेळी फलंदाज शुभमन गिल होता तर हार्टली गोलंदाजी करत होता. हार्टलीने टाकलेला चेंडू गिलच्या पॅडला जाऊन लागला. मात्र अंपायरने त्याला नॉटआउट घोषित केलं. त्यामुळे स्टोक्सने डीआरएसची मागणी केली.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. मात्र इंग्लंडचा संपूर्ण डाव अवघ्या २४६ धावांवर संपुष्टात आला. दरम्यान पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने १ गडी बाद ११९ धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल ७६ तर गिल १४ धावांवर नाबाद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT