jay shah yandex
क्रीडा

Jay Shah Net Worth: जय शहा BCCI कडून एक पैसाही मानधन म्हणून घेत नाहीत; एकूण नेटवर्थ किती?

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. जय शहा हे या बोर्डचे सचिव म्हणून कार्यरत आहे. २०१९ मध्ये त्यांची बीसीसीआयच्या सचिवपदी निवड करण्यात आली होती.

त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. बीसीसीआयमध्ये सचिवपदी कार्यरत असणं, म्हणजे त्यांचं मानधन कोट्यवधींमध्ये असणार, असं तुम्हालाही वाटत असेल. मात्र ते या पदावर काम करताना एक रुपयाही मानधन घेत नाही. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल.

माध्यमातील वृत्तानुसार, जय शहा (Jay Shah( हे सचिवपदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी एक रुपयाही मानधन घेत नाहीत. हे अनेकांना पटणार नाही. मात्र हे खरं आहे. माध्यमातील वृत्तानुसार, जय शह यांची नेट वर्थ ही १०० कोटींच्या घरात आहे.

बीसीसीआयमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी ते बिझनेसमन होते. ते टेंपल एंटरप्राईजेसचे डायरेक्टर होते. ही कंपनी २०१६ मध्येच बंद पडली. यासह कुसुन फिनसर्वमध्ये त्यांची ६० टक्के इतकी भागीदारी आहे. (Jay Shah Net Worth)

जय शहा यांची एकूण संपत्ती किती?

जय शहा हे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव आहेत. यासह ते बीसीसीआयचे सचिव देखील आहे. जय शहा यांनी निरमा विश्वविद्यालयमधून आपलं बी.टेकचं शिक्षण पूर्ण केलं आहे. माध्यमातील वृत्तानुसार, त्यांची एकूण संपत्ती ही १२५-१५० कोटी इतकी आहे. बीसीसीआयमधून कमाई करत नसले, तरीदेखील ते बिझनेसमधून कोट्यवधी रुपये कमावतात.

आयसीसीचे अध्यक्ष होणार?

जय शहा हे बीसीसीआयचे सचिव आहेत. यासह त्यांच्याकडे एशियन क्रिकेट काऊंसिलच्या अध्यक्षांचं देखील पद आहे. त्यामुळे इथून देखील ते कमाई करतात. दरम्यान अशी चर्चा सुरु आहे की, जय शहा हे आयसीसीचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. सध्या ग्रेग बार्कले हे आयसीसीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाळ हा लवकरच समाप्त होणार आहे.

यासह त्यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यांनी निवडणूक लढवली नाही, तर जय शहा हे आयसीसीचे पुढील अध्यक्ष होऊ शकतात. असं झाल्यास ते आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT