IPL 2023 Playoff Schedule Saam TV
Sports

IPL 2023 Playoff Schedule: आयपीएल २०२३ प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी आणि कुठे खेळली जाणार फायनल

IPL 2023 Playoff: बीसीसीआयने आयपीएल २०२३ च्या प्लेऑफ आणि अंतिम सामन्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

Satish Daud

IPL 2023 Playoff Schedule: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा १६ वा हंगामात जोमात सुरू आहे. क्रिडाप्रेमींना यंदाच्या हंगामात रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. आतापर्यंत यंदाच्या हंगामात २९ सामने खेळवण्यात आले असून प्रत्येक सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत जात आहे. एकीकडे गुणतालिकेत प्रत्येक संघात चढाओढ सुरू असताना दुसरीकडे बीसीसीआयने आयपीएल २०२३ च्या प्लेऑफ आणि अंतिम सामन्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

यापूर्वी आयपीएलच्या साखळी फेरीचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले होते. पण आता बीसीसीआयने प्ले ऑफ आणि फायनलचे सामने नेमके कधी आणि कुठे होणार हे आता जाहीर केले आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या तारखेनुसार, आयपीएल २०२३ चा पहिला क्वालिफायर सामना २३ मे रोजी आणि एलिमिनेटर सामना २४ मे रोजी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होणार आहे.

तर दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना २६ आणि २८ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून यात तब्बल 1 लाख प्रेक्षक एकत्र बसून सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.

आयपीएल २०२३ चे लीग लीग सामने २१ मे रोजी संपणार आहे. यानंतर क्रिडाप्रेमींना प्लेऑफचा थरार पाहायला मिळणार आहे. २३ मे रोजी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर पहिला क्वालिफायर सामना खेळवला जाईल. यामध्ये गुणतालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये सामना होईल.

यानंतर २४ मे रोजी या मोसमातील एलिमिनेटर सामना होईल. यात पॉइंट्स टेबलमधील तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये सामना होईल. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावरच खेळवला जाईल. यानंतर या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना २६ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

या सामन्याते पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरमधील विजेता संघ आमनेसामने असतील. त्याचबरोबर अंतिम सामना २८ मे रोजी होणार आहे. या मोसमातील पहिला सामनाही याच स्टेडियममध्ये खेळवला गेला होता, तर गेल्या मोसमातील अंतिम सामनाही येथेच झाला होता.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील दुकाने राहणार 24 तास खुली, कोणती दुकाने असतील बंद

Maharashtra Politics : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत पोसलेली कुत्री; कुणी केली जहरी टीका?

Maharashtra Live News Update: मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारच, पोलिसांची परवानगी

Ranveer Singh: या हॉरर चित्रपटाचा भाग होणार रणवीर सिंग, लवकरच होईल चित्रपटाची घोषणा

Maharashtra Politics : शरद पवार - अजित पवार यांची भेट, तासभर चर्चेत नेमकं काय झालं? | VIDEO

SCROLL FOR NEXT