IPL 2023, CSK vs SRH: फिरकीपट्टू रविंद्र जडेजाचा भेदक मारा आणि त्याला अन्य गोलंदाजांनी दिलेल्या सुरेख साथीच्या जोरावर चेन्नई सुपकिंग्जने सनराईज हैदराबादला १३४ धावांवर रोखलं. चेन्नईच्या गोलंदाजीसमोर हैदराबाद संघाची दाणादाण उडली. हैदराबादकडून अभिषेक शर्माचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला ३० धावसंख्येचा पल्ला पार करत आला नाही.
चेन्नईच्या एमए चितंबरम स्टेडियमवर प्रथम नाणेफेक जिंकून चेन्नई सुपरकिंग्जने गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादने अत्यंत संयमी सुरूवात केली. हॅरी ब्रूक आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादला चांगली सुरुवात करुन दिली
दोघांमध्ये चांगली भागीदारी होत असताना आकाश सिंहने हॅरी ब्रूकला माघारी पाठवलं. ब्रूकने १३ चेंडूत १८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन चौकार लगावले. हॅरी ब्रूक बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा यांनी डाव सावरला. दोघांनी चांगली भागिदारीही केली.
मात्र, महेंद्रसिंग धोनीने रवींद्र जडेजाकडे चेंडू सोपावला. जडेजाने लागोपाठ दोन विकेट घेत हैदराबादला बॅकफूटवर ढकललं. जडेजाने आधी अभिषेक शर्माला रहाणेकरवी झेलबाद केले. अभिषेकने २६ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीही लगेच तंबूत परतला.
राहुल त्रिपाठीने २१ चेंडूत २१ धावांची खेळी केली. त्रिपाठीनंतर कर्णधार एडन मार्करमही १२ धावांवर बाद झाला. हेनरिक कालसेन याला चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. कालसेन याने १६ चेंडूत १७ धावांचे योगदान दिले. मयांक अग्रवालला हैदराबादने फिनिशर म्हणून खेळवले. पण जडेजाने त्याला सुद्धा झटपट माघारी पाठवलं.
वॉशिंगटन सूंदर आणि मार्को जानसेन यांनी अखेरच्या दोन षटकात आक्रमक फलंदाजी केल्यामुळे हैदराबादची धावसंख्या १३० च्या पुढे पोहचली. वॉशिंगटन सुंदर याने ९ धावा केल्या तर मार्को जानसन याने १७ धावांचे योगदान दिले. हैदराबादच्या संपूर्ण डावात फक्त दोन षटकार आणि ११ चौकार लगावण्यात आला आहे.
चेन्नईच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच अचूक टप्प्यावर मारा केला. आकाश सिंह, तुषार देशपांडे आणि ज्युनिअर मलिंगा यांनी भेदक मारा केला. तर मोईन अली, रविंद्र जाडेजा आणि महिश तिक्ष्णा यांनी फिरकीच्या जाळ्यात हैदराबादच्या फलंदाजांना फसवले. चेन्नईकडून रविंद्र जडेजा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात २२ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट घेतल्या. तर आकाश सिंह, महिश तिक्ष्णा, पथिराणा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.