भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देशांतर्गत क्रिकेटसाठी (Domestic events) बायो-बबलचे नियम हटवण्याच्या तयारीत आहे. जेव्हापासून जगात कोरोना (COVID-19) आला तेव्हापासून देशात सर्वच खेळाडूंना बायो-बबलच्या नियमामधून जावं लागले. यासोबतच टीमसोबत सराव किंवा सामना खेळण्यासाठी विलगीकरण कालावधी पुर्ण करावा लागतो.
बायो-बबलमुळे अनेक खेळाडूंना थकवा जाणवत असल्याची तक्रार आहे. बीसीसीआयने या महिन्यात दोन देशांतर्गत स्पर्धांमध्ये हा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. अंडर-19 कूचबिहार ट्रॉफी नॉकआउट्स आणि सीनियर महिला टी-20 ट्रॉफी 18 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. संघांना सांगण्यात आले आहे की स्पर्धेसाठी यजमान शहरांमध्ये आगमन झाल्यानंतर खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्याची गरज नाही.
महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून कोरोना आला आहे तेव्हापासून खेळाडूंसह सर्वच स्टापला विलगीकरण आणि बायो-बबलचे नियम पाळावे लागत होते. बीसीसीआय हा जगातील पहिलाच प्रयोग करत आहे. यामध्ये खेळाडूंच्या प्रकृतीची काळजी म्हणून वारंवार RT-PCR चाचणी केली जाणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या सूचनांनुसार, संघ स्पर्धेच्या तीन दिवस आधी आपल्या सराव शिबीरात सामिल होऊ शकतात आणि दुसऱ्या दिवसापासून लगेच त्यांचा सराव सुरू करू शकतात.
दरम्यान, खेळाडूंना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. संघांना हॉटेलमध्ये ठेवले जाईल आणि बाहेर व्यक्तींना भेटण्यास सक्त मनाई असणार आहे. बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार “जेव्हा आयपीएलचे वेळापत्रक तयार करण्यात आले होते, तेव्हा कोरोनाची तिसरी लाट सुरू होती. अनेक शहरात स्पर्धा घेवून बोर्डाला कोणतीही जोखीम पत्करायची नव्हती. बीसीसीआय सध्या कोरोनाची मोठी काळजी घेत आहे. त्यामुळे स्पर्धाही फक्त दोन शहरात खेळवली जात आहे.''
आयपीएल दरम्यान तीन संघांच्या महिला T20 स्पर्धेमध्ये खेळाडूंना बायो बबलच्या नियमांमधून सुट मिळणार आहे. दरम्यान आयसीसी देखील बबलचे नियम हटवण्याचा विचार करत आहे. या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या बैठकीत याबाबत विचार केला जाऊ शकतो.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.