jasprit bumrah saam tv
Sports

BCCI New Rule In Cricket: BCCI कडून क्रिकेटच्या नियमात मोठा बदल; फलंदाजांची पळता भुई, तर गोलंदाजांना मिळणार आणखी एक अस्त्र

BCCI Bouncer Rule: बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामुळे गोलंदाजांना दिलासा मिळणार आहे

Ankush Dhavre

Syed Mushtaq Ali Trophy: सध्या क्रिकेटला फलंदाजांचा खेळ आहे, असं म्हटलं जातं. यामागचं कारण असं की, जे काही नियम लागू केले जात आहेत ते फलंदाजांची फायदेशीर आहेत. तर गोलंदाजांवर बंधनं लादली गेली आहेत.

हेच कारण आहे की,फलंदाज धावांचा पाऊस पाडताना दिसून येत असतात. दरम्यान बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामुळे गोलंदाजांना दिलासा मिळणार आहे.

आतापर्यंत गोलंदाजाला एका षटकात केवळ १ बाऊंसर चेंडू टाकण्याची अनुमती आहे. तर गोलंदाजाने दुसरा बाउन्सर टाकल्यास नो चेंडू घोषित केला जातो. मात्र बीसीसीआयने आता या नियमात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापुढे गोलंदाजांना एकाच षटकात २ बाउन्सर चेंडू टाकण्याची अनुमती दिली जाणार आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीपासून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे.

IPL मध्ये लागु होणार नविन नियम?

हाच नियम IPL मध्ये देखील लागू केला जाणार का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. यापू्र्वी देखील जे नियम सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत लागू केले गेले होते तेच नियम IPL स्पर्धेत देखील लागू केले गेले आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू केला गेला होता.

त्यानंतर आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियमाची एंट्री झाली होती. मात्र बीसीसीआयने या नियमात थोडा बदल केला होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये १४ वे षटक सुरु होण्यापूर्वी या नियमाचा वापर करण्याची अट घालण्यात आली होती. तर आयपीएल स्पर्धेदरम्यान केव्हाही इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा वापर करण्याची मुभा देण्यात आली होती. (Latest sports updates)

गोलंदाजांचा होणार फायदा..

बीसीसीआयच्या या निर्णयामुळे नक्कीच गोलंदाजांचा फायदा होणार आहे. कारण बाउन्सर चेंडू हा गोलंदाजांसाठी फायदेशीर आणि फलंदाजांसाठी घातक ठरू शकतो.

यापूर्वी गोलंदाजांना एका षटकात केवळ १ बाउन्सर चेंडू टाकण्याची मुभा होती. आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेपासून २ बाउन्सर टाकण्याचा नियम लागू केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

Weather Update: उन्हाच्या तडाख्यात 9 राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ, कोणत्या राज्यांसाठी हवामान विभागानं दिला अलर्ट?

Gokul Election: निकाल जाहीर होताच महायुतीला दाखवला कोल्हापुरी हिसका; मुश्रीफ,नरकेंचं नाव घेत सतेज पाटील काय म्हणाले?

साठीच्या शिवसेनेला GEN Zचा चेहरा, आदित्य ठाकरे शिवसेनेचे नवे कार्याध्यक्ष?

Gokul Election: सतेज पाटलांचा नादखुळा; महायुतीच्या चार पहेलवानांना घोबीपछाड

SCROLL FOR NEXT