Sourav Ganguly Birthday Special: भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली हे भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांनी भारतीय संघाचा कर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष असा प्रवास केला. सौरव गांगुली यांनी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दादागिरी सुरू केली. तेव्हापासून भारतीय संघाने आक्रमक क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
सौरव गांगुली यांचा जन्म ८ जुलै १९७२ रोजी झाला होता. ते आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरम्यान या खास दिवशी जाणून घ्या सौरव गांगुलीबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी. (Sourav Ganguly Birthday)
सौरव गांगुली उजव्या हाताने फलंदाजी करायचे..
सौरव गांगुली यांना तुम्ही डाव्या हाताने फलंदाजी करताना पाहिलं असेल. मात्र तुम्हाला जर सांगितलं की, ते उजव्या हाताचे फलंदाज आहेत? तर नक्कीच तुम्ही विचारात पडाल. मात्र हे खरं आहे. सौरव गांगुली हे उजव्या हाताचे फलंदाज आहेत.
ते उजव्या हाताने गोलंदाजी करतात. ते लिहितात उजव्या हाताने, गोलंदाजीही उजव्या हाताने करतात. मात्र फलंदाजी डाव्या हाताने करतात. यामागचं कारण असं की, त्यांचे भाऊ स्नेहशिष हे डाव्या हाताचे फलंदाज आहेत. त्याची क्रिकेट किट वापरता यावी सौरव गांगुली यांनी डाव्या हाताने फलंदाजी करायला सुरुवात केली.
क्रिकेट नव्हे तर फुटबॉल खेळायला आवडायचं..
क्रिकेटच्या मैदानावर दादा म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या सौरव गांगुली यांना फुटबॉल खेळायला खूप आवडायचं. मात्र मोठ्या सनेहशिषमुळे त्यांना क्रिकेट क्लबची वाट धरावी लागली होती. पुढे जाऊन सौरव गांगुली यांची बंगाल रणजी संघात निवड झाली. (Sourav Ganguly Unknown Facts)
सौरव गांगुली यांची कारकीर्द...
सौरव गांगुली यांनी भारतीय संघासाठी ३११ वनडे सामने खेळले. यादरम्यान त्यांनी ११३६३ धावा केल्या. ज्यात २२ शतके आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ११३ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ७२१२ धावा केल्या आहेत. ज्यात १६ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.