virat kohli with rohit sharma, IND vs SL saam tv
Sports

BCCI Central Contract: IPL सुरु असताना रोहित- विराटचं टेन्शन वाढलं! BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

BCCI Central Contract: येत्या काही दिवसात बीसीसीआयची सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर केली जाऊ शकते.

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) महिला क्रिकेट संघाच्या सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळवणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. महिलांची यादी जाहीर केल्यानंतर, लवकरच पुरुष क्रिकेट संघाची सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर केली जाऊ शकते. यावेळी सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीत मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

गेल्यावेळी जेव्हा सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण श्रेयस अय्यर आणि इशान किशनला यादीतून वगळण्यात आलं होतं. यावेळी श्रेयस अय्यरने जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा तेव्हा संधीचं सोनं केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याने वनडे क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. यासह भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात अय्यरने मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याला बीसीसीआयच्या सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठं सरप्राईज मिळू शकतं.

या खेळाडूंचं टेन्शन वाढणार

भारतीय संघातील स्टार खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजासारखे खेळाडू यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा हे तिन्ही खेळाडू बीसीसीआयच्या ए प्लस कॅटेगरीत होते. मात्र या तिघांनीही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे काही अधिकाऱ्यांना असं वाटतंय की, या तिघांनाही या कॅटेगरीतून बाहेर करावं. तर काहींना अजूनही वाटतंय की, या तिघांनी याच कॅटेगरीत राहावं. बीसीसीआयकडून ए प्लस कॅटेगरीत असलेल्या खेळाडूंना ७ कोटी रुपये मानधन दिले जाते.

बीसीसीआयकडून ए कॅटेगरीत त्याच खेळाडूंना स्थान दिले जाते, जे खेळाडू सातत्याने तिन्ही फॉरमॅट खेळत आहेत. हे तिन्ही खेळाडू संघातील दिग्गज खेळाडू आहेत, जे तिन्ही फॉरमॅट खेळत होते. मात्र आता हे तिघे टी-२० क्रिकेट खेळताना दिसून येणार नाहीये. त्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT