Hardik Pandya Suryakumar yadav saamtv
Sports

Team India: पांड्या- सुर्यकुमारला लागणार प्रमोशनची लॉटरी? 'या' खेळाडूंचे भविष्य अंधारात? आज होणार फैसला

दुर्दैवाने, असे काही क्रिकेटपटू आहेत जे त्यांचे करार गमावणार आहेत. त्याचाही फैसला या बैठकीत होईल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

BCCI Central Contracts 2022-23: आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अपेक्स काउंसिलची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाचे प्रमोशन होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या केंद्रिय करारात यावर्षी अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्या आणि सुर्यकुमार यादव यांचे प्रमोशन होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

बीसीसीआयच्या (BCCI) आगामी बैठकीत हार्दिक पांड्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्याचीही शक्यता आहे. दुसरीकडे, सूर्याने टी-20 मध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे आणि तो यावर्षी सर्वाधिक टी-20 धावा करणारा खेळाडू आहे. त्यामुळे त्यालाही बढती मिळू शकते. सुर्यकुमार आणि हार्दिक पांड्या गेल्यावर्षी क श्रेणीत होते. आता त्यांचा अ श्रेणीत समावेश होऊ शकतो.

त्याचबरोबर या बैठकीत कर्णधारपदाबद्दही मोठा निर्णय घेतली जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माकडे ( Rohit Sharma)वनडे आणि कसोटी संघाचेच कर्णधारपद दिले जाऊ शकते. २०२४ मध्ये भारतात टी-२० विश्वचषकही होणार आहे आणि त्यामध्ये टीम इंडिया युवा संघासोबत जेतेपद पटकावण्याची तयारी करू इच्छित आहे. अशा स्थितीत विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी दावेदार असलेल्या खेळाडूंवरही नजरा खिळल्या आहेत.

एकदिवसीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलचाही अ श्रेणीत समावेश होऊ शकतो. त्यामुळे इशांत शर्मा, रवी अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांचे स्थान धोक्यात येईल. जडेजाच्या जागी संघात फिरकी अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावणाऱ्या अक्षर पटेलचाही या करारात समावेश होणार आहे.

दुर्दैवाने, असे काही क्रिकेटपटू आहेत जे त्यांचे करार गमावणार आहेत. इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी आणि ऋद्धिमान साहा ही नावे केंद्रीय करारातून वगळू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

SCROLL FOR NEXT