SMRITI MANDHANA NAMED NEW CAPTAIN OF INDIAN WOMEN’S CRICKET TEAM 
Sports

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Smriti Mandhana New Women’s Team Captain: हरमनप्रीत कौरच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयने स्मृती मंधानाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केलीय. आंतरराष्ट्रीय आणि फ्रँचायझी क्रिकेटमधील अनुभवामुळे मंधानाकडे नेतृत्वाची नवी जबाबदारी आली आहे.

Bharat Jadhav

  • भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी स्मृती मंधानाची नियुक्ती

  • हरमनप्रीत कौरच्या राजीनाम्यानंतर स्मृती मंधाना नवी कर्णधार

  • बीसीसीआयकडून स्मृती मंधानाच्या कर्णधारपदाची घोषणा

हरमनप्रीत कौरने भारतीय महिला क्रिकेट टीम कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयनं नव्या कर्णधाराची तातडीनं घोषणीही केलीय. हरमनप्रीतने इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर करत कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती. दरम्यान यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी स्मृती मानधना हिची नियुक्ती जाहीर केलीय.

गेल्या काही वर्षांत भारतीय महिला क्रिकेटमधील प्रमुख खेळाडूंपैकी एक असलेल्या स्मृतीने संघाच्या विविध प्रकारांमध्ये धमाकेदार कामगिरी केलीय. एक अनुभवी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून तिने देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्येही आपल्या नेतृत्वाचे प्राविण्य दाखवलंय. यात २०२४ आणि २०२६ मध्ये 'रॉयल ​​चॅलेंजर्स बेंगळुरू'ला 'महिला प्रीमियर लीग'चे (WPL) विजेतेपद मिळवून देण्यात तिने महत्त्वाची कामगिरी केली होती. त्यावेळी स्मृती मानधना ही आरसीबी संघाचं नेतृत्त्व करत होती.

२०१३ पासून भारतीय संघाची खेळाडू असलेल्या स्मृतीकडे या नव्या भूमिकेसाठी आवश्यक असा अनुभव आहे. आता ती संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारणार आहे. आता ती 'व्हाईट-बॉल' (मर्यादित षटकांच्या) क्रिकेटमध्ये भारताची पूर्णवेळ कर्णधार असणार आहे. याआधीही तिने १८ टी-२० आंतरराष्ट्रीय आणि ४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केलंय.

आपल्या या नियुक्तीबद्दल बोलताना स्मृती मानधना म्हणाली, "भारताचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळणे हा एक अत्यंत विशेष सन्मान आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी नेहमीच खूप महत्त्वाची गोष्ट राहिली आहे आणि आता संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत मोलाची बाब आहे.

बीसीसीआय (BCCI), निवड समिती, माझे सहकारी खेळाडू आणि माझ्या प्रवासात मला साथ देणाऱ्या व माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या प्रत्येकाची मी ऋणी आहे. "तसेच, हरमनप्रीतने गेल्या काही वर्षांत कर्णधार म्हणून दिलेल्या योगदानही लक्षात घेतला पाहिजे, तिने अत्यंत निष्ठेने संघाचे नेतृत्व केले आहे आणि ती आमच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

Oxidized Jewellery : नवरात्रीसाठी प्रत्येक मुलीकडे असावीत ‘हे’ ७ प्रकारचे ट्रेंडी ऑक्सिडाइज्ड दागिने

ठाण्यातील पूर्णेकर हत्या प्रकरणाचा पुरावा रायगडात सापडला, सत्य येणार बाहेर; SITच्या हाती काय लागलं?

मिट्ट काळोखात मोबाईल पाहण्याची सवय किती धोकादायक? आरोग्यावर होणारे 5 वाईट परिणाम

SCROLL FOR NEXT