Ind Vs NZ Team India Sqaud SAAM TV
Sports

Ind Vs NZ Team India Sqaud : टीम इंडियात 'पृथ्वी शॉ' नावाचं वादळ आलं, कसा असेल संपूर्ण संघ?

Team India Squad For Ind vs NZ Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.

Nandkumar Joshi

Team India Squad For Ind vs NZ Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडियात पृथ्वी शॉ नावाचं वादळ आलं आहे. जवळपास दीड वर्षानं त्याची संघात वापसी झाली आहे.

बीसीसीआयने (BCCI) शुक्रवारी, १३ जानेवारीला रात्री उशिरा न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी २० मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची (Indian Cricket Team) घोषणा केली आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India Vs New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १८ जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यानंतर २७ जानेवारीपासून ३ सामन्यांची टी २० मालिकाही होणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी के. एल. राहुल आणि अक्षर पटेल या दोघांना कौटुंबिक कारणांमुळे विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अन्य खेळाडूंना संधी मिळाली आहे.

पृथ्वी शॉ दीड वर्षानं येतोय...

टी २० संघासाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) दीड वर्षानं भारतीय संघात परततोय. पृथ्वी भारतासाठी आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै २०२१ मध्ये खेळला होता. श्रीलंका दौऱ्यावर असताना तो संघात होता. त्यावेळी पृथ्वीने टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला होता.

या सामन्यानंतर त्याला पुन्हा संघात संधी मिळू शकली नव्हती. त्यानंतर पृथ्वी शॉने आयपीएल आणि इतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. अलीकडेच पृथ्वी शॉने आसामविरुद्ध रणजी ट्रॉफीमध्ये ३७९ धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळं सगळ्यांचंच त्याच्याकडे लक्ष गेलं आणि संघात संधी देण्यात आली.

सॅमसनला वगळलं की अनफिट आहे?

टीम इंडियाच्या निवड समितीनं संजू सॅमसनला संधी दिली नाही. श्रीलंकाविरुद्धच्या टी २० मालिकेत संजू सॅमसनला पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर तो संपूर्ण मालिकेतून 'बाद' झाला.

त्याला वनडे मालिकेतही घेतलं नाही. बीसीसीआयने आपल्या प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सॅमसनच्या दुखापतीबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे संजूला वगळण्यात आलं की तो अनफिट आहे, या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही.

केएस भरतला संधी

वरिष्ठ निवड समितीनं हैदराबादच्या केएस भरतला पहिल्यांदाच वनडे संघात संधी दिली आहे. भरत हा कसोटी मालिकेसाठी मुख्य यष्टीरक्षक असेल. तर टी २० मालिकेसाठी जितेश हा इशानचा बॅकअप विकेटकीपर म्हणून संघात असेल. तर फिरकीपटू रवी बिश्नोईला पुन्हा संघात स्थान मिळू शकलेले नाही.

भारताचा एकदिवसीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

भारताचा टी २० संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, जितेश शर्मा, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, शिवम मावी, उमरान मलिक, मुकेश कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT