ben duckett twitter
Sports

BBL 2024: एकच नंबर! डकेटने उडी मारत एका हाताने घेतला भन्नाट कॅच- VIDEO

Ben Duckett Catch: बिग बॅश लीग स्पर्धेत अॅडलेड विरुद्ध मेलबर्न यांच्यात पार पडलेल्या सामन्यात बेन डकेटने अप्रतिम झेले घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

बिग बॅश लीग स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील सहावा सामना अॅडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध मेलबर्न स्टार्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना अॅडलेड स्ट्रायकर्स या संघाने २० षटकअखेर ६ गडी बाद १६५ धावा केल्या.

दरम्यान या डावात मेलबर्न स्टार्सचा स्टार क्षेत्ररक्षक बेन डकेटने शानदार झेल घेतला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

बेन डकेटने घेतला भन्नाट झेल

या सामन्यात मेलबर्न स्टार्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मेलबर्न स्टार्सने ६ गडी बाद १६५ धावा केल्या. मेलबर्नकडून फलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर डार्सी शॉर्ट फलंदाजीला आला.

त्यावेळी स्टार्सकडून पीटर सिडल गोलंदाजी करत होता. शॉर्ट तुफान फटकेबाजी करत होता, त्यावेळी १५ व्या षटकात डकेटने त्याचा भन्नाट झेल घेतला.

तर झाले असे की, सिडलने १५ व्या षटकातील चौथा चेंडू फुल लेंथवर टाकला. त्यावेळी डकेटने एक्स्ट्रा कव्हरच्या वरुन फटका मारला. हा रॉकेट चेंडू येताच बेन डकेटने उडी मारुन एका हाताने अविश्वसनिय झेल घेतला. या भन्नाट झेलसह त्याची खेळीही संपुष्टात आली.

अॅडलेडने केल्या १६५ धावा

प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या अॅडलेड स्ट्रायकर्स संघाला २० षटकअखेर ६ गडी बाद १६५ धावा करता आल्या. या संघाकडून डार्सी शॉर्टने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. तर अॅलेक्स रॉसने ३५ धावांची खेळी केली.

सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या मॅट शॉर्टने ११, जेक वेदराल्डने ११, जेम्स बेझलीने १६ धावांची खेळी केली. तर स्टार्सकडून गोलंदाजी करताना, अॅडल मिल्नेने २, पिटर सिडलने २, ग्लेन मॅक्सवेलने १ आणि डुह वॉरनने १ गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP आमदाराच्या नावाचं बनावट लेटरहेड; मंजूर कामाऐवजी काढला नव्या कामांचा GR, शिंदे सेनेच्या माजी आमदाराचा कारनामा

शाळेच्या सहलीला गेले, ५५-६० विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाण्यातील घटनेने खळबळ, पालकांमध्ये भीती

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रामरक्षा पठण आणि महाआरती

Akkha Masoor Masala Recipe: घरीच बनवा हॉटेलस्टाईल स्वादिष्ट अख्खा मसूर मसाला; जाणून घ्या सोपी रेसिपी

Healthy Diet : कडधान्य की पालेभाज्या? पावसाळ्यात शरीरासाठी काय योग्य, वाचा

SCROLL FOR NEXT