yuvraj singh  yandex
क्रीडा

Six Ban Rule: षटकार मारल्यास फलंदाज बाद होणार! क्रिकेटच्या या नव्या नियमाची जोरदार चर्चा

Ankush Dhavre

असा एकही क्रिकेटपटू नसेल,ज्याने गल्ली क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला नसेल. गल्ली क्रिकेटची वेगळी नियमावली असते. काही ठिकाणी चेंडू हरवतो म्हणून षटकार मारलं तर बाद असा नियम असतो. हे नियम गल्ली क्रिकेटमध्येच ठिक वाटतात. मात्र असाच नियम क्लब लेव्हल क्रिकेटमध्ये लागु केला तर? असं क्वचितच होऊ शकतं. मात्र इंग्लंडमधील एका क्लब क्रिकेट सामन्यात असाच नियम लागु केल्याचे पाहायला मिळाले आहे.

षटकार मारण्यावर बंदी

इंग्लंडमधील साउथविक आणि शोरहॅम क्रिकेट क्लबने खेळाडूंना षटकार मारण्यावर बंदी घातली आहे. आता हा नियम काही कारण नसताना लागु केलाय, असं नाही. यामागे मोठं कारण दडलंय. ज्या मैदानावर हे सामने खेळवले जातात, त्या मैदानाच्या बाजुला राहणाऱ्या लोकांनी चेंडू लागुन मालमत्तेचं नुकसान होत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे क्रिकेट क्लबने हा निर्णय घेतला आहे. (Six Ban Rule)

षटकार मारल्यास फलंदाज बाद

फलंदाज मोठे फटके खेळतात, त्यामुळे मैदानाच्या बाजुला राहणाऱ्या लोकांच्या मालमत्तेचं नुकसान होतं. हे नुकसान टाळण्यासाठी क्रिकेट क्लबने हा निर्णय घेतला आहे. फलंदाजाने षटकार मारला, तर त्याला वॉर्निंग दिली जाईल. त्यानंतर दुसऱ्यांदा षटकार मारल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला एकही धाव दिली जाणार नाही. यासह फलंदाजाला बाद घोषित केलं जाईल.

हा निर्णय घेतल्यानंतर साउथविक आणि शोरहॅम क्रिकेट क्लबच्या खजिनदार मार्क ब्रॉक्सअप यांनी म्हटले की, 'आधी क्रिकेट शांत वातावरणात खेळलं जायचं. मात्र टी-२० क्रिकेट आल्यानंतर क्रिकेटमधील आक्रमकता आणखी वाढली आहे. स्टेडियमजवळ राहणारे ८० वर्षीय वृद्ध म्हणाले की, आजकालचे युवा खेळाडू इतके उत्साही झाले आहेत की, त्यांना षटकार मारण्यासाठी मैदान अपुरं पडत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT