Virat Kohli saam tv
Sports

Virat Kohli: वॉटर बॉक्सवर जोरात बॅट आदळली आणि...; विकेट गमावल्यानंतर विराट कोहलीला राग अनावर, Video व्हायरल

Virat Kohli: न्यूझीलंडच्या टीमने हा सामना ११३ रन्सने जिंकून २-० अशी सिरीजमध्ये आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीला राग अनावर झाल्याचं दिसून आलं होतं.

Surabhi Jayashree Jagdish

पुण्याच्या एमसीएच्या मैदानावर भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे टीम इंडियाने सलग न्यूझीलंडविरूद्धची टेस्ट सिरीज देखील गमावली. न्यूझीलंडच्या टीमने हा सामना ११३ रन्सने जिंकून २-० अशी सिरीजमध्ये आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज काहीसे पूर्णपणे फेल गेल्याचं दिसून आलं.

वरिष्ठ खेळाडू ठरले फ्लॉप

या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची बॅट देखील काही खास कामगिरी करू शकली नाही. त्याचप्रमाणे विराट कोहलीला देखील मोठी खेळी करता आली नाही. दरम्यान या सामन्यात विकेट गेल्यानंतर विराटला पुन्हा एकदा राग अनावर झाल्याचं दिसून आलं आहे.

विराटला पुन्हा एकदा राग अनावर

३०व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर कोहलीला अंपायरने एलबीडब्ल्यू आऊट दिलं. यावेळी विराट केवळ १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी कोहलीने रिव्ह्यू घेतला आणि रिप्लेमध्ये बॉल लेग स्टंपला लागत असल्याचं दिसून आलं. यानंतर कोहली खूप रागावलेला दिसला. तो फील्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थला काहीतरी म्हणाला. नंतर तो निघून गेला.

यावेळी पॅव्हेलियनमध्ये परतताना कोहलीला राग अनावर झाला. मैदानातून बाहेर पडल्यानंतर ड्रेसिंग रुमच्या दिशेने जाताना ठेवलेल्या वॉटर बॉक्सवर त्याने बॅट मारली. दरम्यान कोहलीची ही घटना कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही टेस्ट सिरीज जिंकत न्यूझीलंडच्या टीमने इतिहास रचला. न्यूझीलंडच्या या विजयाचा खरा हिरो ठरला मिचेल सँटनर. त्याने भारताच्या पहिल्या डावात सात आणि दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेत आपल्या ऐतिहासिक कामगिरी केली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा मार्ग खडतर

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात होती. मात्र सलग २ पराभवांनंतर फायनलमध्ये जाण्याचा मार्ग भारतासाठी खडतर झाला आहे. यासाठी आता टीम इंडियाला मुंबईतील वानखेडे स्टेडियवर होणाऱ्या सामन्यात कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागणार आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरूद्धची सिरीज कुठल्याही परिस्थितीत ३-२ ने जिंकावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT