IPL 2026 Lifts ban by Bangaladesh saam tv
Sports

IPL 2026 lifts ban : IPL सामन्यांवरील बंदी उठवली; या सरकारनं घेतला मोठा निर्णय

bangladesh lifts ban on ipl 2026 live telecast update : आयपीएल २०२६ आज, शनिवारपासून सुरू होणार आहे. त्याआधीच बांगलादेश सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या लाइव्ह प्रेक्षपणावरील बंदी उठवण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

आयपीएल २०२६ (IPL 2026) सामन्यांचा थरार आज, शनिवारपासून सुरू होत आहे. १९ व्या पर्वातील पहिलाच सामना अत्यंत प्रेक्षणीय होणार आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ही लढत होत आहे. अवघ्या काही तासांत हा सामना सुरू होत आहे. त्याआधीच बांगलादेश सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल सामन्यांच्या लाइव्ह प्रेक्षपणाबाबत यूटर्न घेतला आहे.

मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर केल्यानंतर बांगलादेश सरकारनं आयपीएल सामन्यांचे आपल्या देशातील लाइव्ह प्रेक्षपणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएल स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार असून, त्याआधीच बांगलादेश सरकारनं हा बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. आयपीएल सामन्यांवरील बंदी उठवण्यात आली आहे. बांगलादेशचे नवनिर्वाचित माहिती आणि प्रसारण मंत्री जाहिद उद्दीन स्वपन यांनी शनिवारी या वृत्ताला दुजोरा दिला.

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारने आयपीएल सामन्यांच्या लाइव्ह प्रेक्षपणावर बंदी घातली होती. सरकारच्या आदेशानंतर स्थानिक वाहिन्या आणि ऑपरेटर्स आयपीएल सामन्यांचे प्रेक्षपण करू शकत नव्हते. यामुळे बांगलादेशातील आयपीएल स्पर्धेचे चाहत्यांची निराशा झाली होती. हे सामने बघण्यापासून वंचित राहणार होते. मात्र, आता त्यांना हे सामने लाइव्ह अनुभवता येणार आहेत.

बांगलादेशातील नव्या सरकारने आयपीएल सामन्यांच्या प्रेक्षपणाबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. आयपीएल सामन्यांच्या प्रेक्षपणावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेश सरकारच्या या भूमिकेमुळं भारत-बांगलादेश या दोन देशांतील तणावपूर्ण संबंध निवळण्यास काही प्रमाणात मदत होणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जाहिद यांच्या म्हणण्यानुसार, आयपीएल सामन्यांचे लाइव्ह प्रेक्षपण सुरू करण्यासाठी कुणीही आमच्याकडे अर्ज केलेला नाही. आम्ही खेळाला राजकारणाशी जोडू इच्छित नाहीत. आम्ही याकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून बघत आहोत. जर कोणत्या चॅनलने आयपीएल सामन्यांचे प्रेक्षपण करण्यासाठी अर्ज केला तर, त्यावर सकारात्मक दृष्टीने विचार करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSC SSC Result 2026 : दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट

Actress Hospitalised: 'वजन कमी झालं, चालताही येत नाही...'; हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादला रुग्णालयात केलं दाखल

Sunil Tatkare controversy: 'कोकाटेंना मंत्री करु नका' खरातचा तटकरेंना फोन; विकास लवांडे यांच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Live News Update: स्वयंघोषित धर्मगुरु ऋषिकेश वैद्यला केलं लष्कर कोर्टात हजर

Maharashtra Government: प्रति शेळी, मेंढीसाठी ४ तर दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार रुपये; पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी सरकारकडून नव्याने मदतीची घोषणा

SCROLL FOR NEXT