Shakib Al Hasan Ruled Out twitter (X)
क्रीडा

Shakib Al Hasan Ruled Out: मॅथ्यूजला टाईम आऊट करणारा शाकिब WC 2023 स्पर्धेतून बाहेर! मोठं कारण आलं समोर

Shakib Al Hasan Ruled Out From World Cup 2023: बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Ankush Dhavre

Shakib Al Hasan Ruled Out From World Cup 2023:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात झालेला सामना ऐतिहासिक ठरला आहे. या सामन्यात अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट होऊन माघारी परतला. शाकिब अल हसनने अपील केल्यानंतर अंपायरने त्याला बाद घोषित केलं.

दरम्यान या सामन्यानंतर बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. शाकिब अल हसन वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात फलंदाजी करत असताना त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे.

या दुखापतीमुळे तो वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बांगलादेशचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात तो खेळताना दिसून येणार नाही.

फिजिओची माहिती..

बांगलादेश संघाचे फिजिओ बेजेदुल इस्लाम यांनी शाकिब अल हसनच्या दुखापतीबाबत माहिती देत म्हटले की,'डावाच्या सुरुवातीलाच शाकिब अल हसनच्या डाव्या बोटाला दुखापत झाली होती. मात्र त्याने पेनकिलर आणि सपोर्टिव्ह टेपिंग घेऊन फसंदाजी सुरु ठेवली.'

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की,'सामना झाल्यानंतर दिल्लीत त्याचा इमर्जन्सी एक्स- रे घेण्यात आला. या एक्स- रे मधून असं दिसून आलं आहे की, त्याच्या डाव्या पीआयपी जॉइंटवर फ्रॅक्चर आहे. त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तो आज बांगलादेशला रवाना होईल.'

बांगलादेशला मिळवून दिला विजय..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेकडून प्रथम फलंदाजी करताना असलंकाने सर्वाधिक १०८ धावांची खेळी केली . तर पथुम निसंकाने ४१ धावांची खेळी केली . श्रीलंकेचा डाव २७९ धावांवर संपुष्टात आला. (Latest sports updates)

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी २८० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशकडून नजमूल हुसेन शांतोने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली. तर कर्णधार शाकिब अल हसनने ८२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर ३ गडी राखून मात केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

SCROLL FOR NEXT