Bajrang Punia Post on Vinesh Phogat Saam TV
Sports

Bajrang Punia Post : तिला देशात लाथांनी चिरडलं, फरफटत नेलं; विनेश फोगाटच्या विजयावर बजरंग पुनियाची पोस्ट

Bajrang Punia Post on Vinesh Phogat : भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने विनेश फोगाटच्या सिस्टिमविरुद्धच्या लढ्याची आठवण करून दिली आहे.

Satish Daud

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने मंगळवारी (ता. ६) नवा इतिहास रचला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशने महिलांच्या ५० किलो वजनी गटातील फ्री-स्टाईल प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली.

सेमीफायनल सामन्यात तिने क्युबाच्या युस्नेलिस लोपेजला आस्मान दाखवलं आणि भारतासाठी चौथं पदक पक्कं केलं. या ऐतिहासिक कामगिरीनंतर विनेशवर संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी विनेशचं कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत.

पण असं असतानाच भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने विनेशच्या सिस्टिमविरुद्धच्या लढ्याची आठवण करून दिली आहे. विनेश फोगटच कौतुक करण्याबरोबर तिने गेल्या वर्षभरात बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध कसा लढा दिला होता, याबाबतच्या आठवणी बजरंग पुनियाने पुन्हा ताज्या करून दिल्या आहेत.

गेल्या वर्षभरात भारतीय महिला कुस्तीपटूंवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा चर्चेत आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह अन्य भारतीय खेळाडूंनी कुस्ती महासंघाचा माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग विरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

इतकंच नाही, तर त्यांनी बृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात आंदोलनही केलं होतं. विशेष बाब म्हणजे, या आंदोलनात विनेश फोगाट आघाडीवर होती. पुढे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू झाली. अद्यापही त्याचा निकाल लागलेला नाही. अशात विनेश फोगाटने आता ऑलिम्पिकमध्ये पदक निश्चित केल्यानंतर याबाबत पुन्हा चर्चांना उधाण आलंय.

बजरंग पुनियाने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?

विनेशच्या फोगाटने फायनलमध्ये प्रवेश करताच कुस्तीपटू बजरंग पुनियाने तिचे कौतुक करत X अकाउंटवर खास पोस्ट केली आहे. "विनेश फोगाट भारताची ती वाघीण आहे, सलग दोन सामन्यात ४ वेळची वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवलंय. त्यानंतर तिने माजी वर्ल्ड चॅम्पियनला हरवलंय", असं बजरंगने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

पुढे बजरंग लिहतो की, "एक गोष्ट सांगू. याच मुलीला स्वत:च्या देशात लाथा मारण्यात आल्या. तिला रस्त्यांवरून फरफडत देखील नेण्यात आलं. पण आता हीच मुलगी देशाची मान उंचावणार आहे. ती जगभरात भारताचा डंका वाजवणार आहे. पण खंत याचीच आहे की, ती देशात सिस्टीमविरुद्ध हरली होती".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT