बाली : काेरियाच्या एन सेयुंग (an seyoung) हिने बॅडमिंटन स्पर्धेतील (BWF World Tour Finals) अंतिम सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा (pvsindhu) एकतर्फी पराभव करीत करंडकावर दक्षिण कोरियाची माेहाेर उमटवली. हा करंडक जिंकणारी एन सेयुंग काेरियाची पहिला महिला बॅडमिंटनपटू (badminton) ठरली आहे.
भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूवर सामन्याच्या पहिल्यापासून एन सेयुंग हिने आक्रमक खेळी करीत दबावतंत्र अवलंबविले. पहिल्या सेटमध्ये तिने २१-१६ असा सिंधूवर विजय मिळविला. सिंधूने पहिल्या सेटच्या शेवटच्या टप्प्यात झुंज दिली मात्र एन सेयुंगने लक्ष विचलीत न करता जबरदस्त स्मॅशसह सेट संपवला.
दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने कसाेशिने प्रयत्न केला. परंतु काही काळानंतर तिला झंजावे लागले आणि अखेरीस दुसरा सेट (१२-२१) आणि सामना गमावावा लागला. पीव्ही सिंधूचा एन सेयुंगने २१-१६, २१-१२ असा पराभव करुन करंडकावर आपले नाव काेरले.
सिंधूने उपांत्य फेरीच्या कडव्या लढतीत मात जपानच्या अकाने यामागुचीचा २१-१५, १५-२१, २१-१९ असा पराभव केला होता. सिंधूने तीन वर्षांपूर्वी स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. परंतु सिंधूचा एन सेयुंगने तिस-यांदा पराभव केला आहे.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.