Badminton Asia Team Championships Google
क्रीडा

Badminton Asia Team Championships : भारतीय महिला संघाने गाठली चॅम्पियनशिपची अंतिम फेरी

Bharat Jadhav

Badminton Asia Team Championships 2024 :

भारतीय महिला बॅडमिंटन संघाने शनिवारी प्रथमच बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला बॅडमिंटन संघाने माजी चॅम्पियन जपानच्या संघाचा उपांत्य फेरीत ३-२ असा पराभव केला. (Latest News)

तृषा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानी असलेल्या जोडीने पहिला दुहेरी सामना जिंकला. जागतिक क्रमवारीत ५३व्या स्थानी असलेल्या अस्मिता चालिहाने दुसरा एकेरी सामना जिंकला. तर १७ वर्षीय अनमोल खरबने भारताला विजेतेपदाच्या लढतीत नेण्यासाठी निर्णायक एकेरी सामना जिंकला. भारतीय महिला संघ आता रविवारी अंतिम फेरीत थायलंडशी भिडणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जपानचा संघ अकाने यामागुची (जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या), युकी फुकुशिमा आणि सायाका हिरोटा (जागतिक क्रमवारीत सातव्यास्थानी असलेल्या) आणि मयू मात्सुमोटो आणि वाकाना नागहारा (जागतिक क्रमांक आठवा) यांच्याशिवाय खेळत होता. हे खेळाडू नसताना सुद्धा जपानच्या संघ मजबूत दिसत होता.

भारतीय संघाला जोरदार टक्कर दिली. दरम्यान दुखापतीमधून सावरत मैदानात परतलेल्या पीव्ही सिंधूला मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. सिंधू एकेरी संघात आहोरीच्या विरोधात पराभूत झाली. तिला १३-२१,२०-२२ असा पराभव स्वीकारावा लागला. तृषा आणि गायत्री यांनी पहिल्या दुहेरीत चमकदार कामगिरी करत भारताला २१-१७, १६-२, २२-२० ने विजय मिळवून दिला.

अस्मिताने माजी विश्वविजेत्या नोजोमी ओकुहारा (२०व्या क्रमांकावर) विरुद्ध आक्रमक खेळ दाखवला. भारतीय खेळाडूने त्याच्या क्रॉस शॉट्स आणि स्मॅशचा शानदार वापर करून भारताला २१-१७, २१-१४ असा विजय मिळवत २-१ अशी आघाडी घेतलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT