आयपीएल २०२५ ला सुरुवात झाली असून आतापर्यंत ६ टीम्सने त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तर आज सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. हे दोन्ही संघ २४ मार्च रोजी विशाखापट्टणमध्ये डॉ. वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहे. मात्र लखनौ सुपर जायंट्ससाठीची चिंता काही संपताना दिसत नाहीये.
लखनऊने अलीकडेच त्यांच्या टीममध्ये मोठा बदल केला होता. टीमने जखमी मोहसीन खानच्या जागी शार्दुल ठाकूरचा टीममध्ये समावेश केला. तर आता अशातच त्यांच्या एका खेळाडूला पुन्हा दुखापत झाली आहे.
तुफान गोलंदाज मयंक यादवबाबत एक मोठी बातमी समोर आलीये. पाठीच्या दुखापतीतून सावरत असताना त्याला पुन्हा दुखापत झाल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे आता त्याचं कमबॅक पुन्हा लांबणार का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. २०२४ च्या आयपीएलमध्ये मयंक यादवने चांगली कामगिरी केली होती. मयंक यादव हा सातत्याने १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. मात्र त्याला दुखापत झाल्याने टीमची चिंता मात्र वाढली आहे.
मयंक यादव नुकताच पाठीच्या दुखापतीतून बरा होत होता मात्र पुन्हा पायाच्या नवीन दुखापतीमुळे अडथळा निर्माण झालाय. परंतु लखनौ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना आशा आहे की, तो आयपीएल २०२५ च्या सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. जस्टिन लँगर म्हणाले, 'गेल्या वर्षी मयंकबाबत सर्वजण खूप उत्साहित होते. पाठीच्या दुखापतीतून परतल्यानंतर तो बरा होत होता. मात्र रूममधील बेडला त्याच्या पायाचा अंगठा जोरात आपटला. त्यामुळे त्याच्या पायाच्या बोटाला संसर्ग झाला.
त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी एक किंवा दोन आठवडे जास्त वेळ लागला. पण तो पूर्णपणे ठीक आहे. आम्ही त्याच्या गोलंदाजीचे व्हिडिओ पाहतोय. काल मी त्याचा एक व्हिडिओ पाहिला. त्यामुळे, आशा आहे की स्पर्धेच्या अखेरीस मयंक पूर्णपणे तंदुरुस्त होईल आणि आमच्यासाठी खेळण्यास तयार असेल, असंही लँगर यांनी सांगितलं आहे.
२०२४ च्या आयपीएलच्या मधल्या काळात मयंक यादवला दुखापत झाली होती. त्यावेळी त्याला लीगमधून माघार घ्यावी लागली. त्याने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सिरीजमध्ये टीम इंडियासाठी डेब्यू केलं. पण यानंतर तो पाठीच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका मालिकेत खेळू शकला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.