Babar Azam Viral Video x
Sports

Babar Azam : बिर्याणीवर ताव, मैदानावर बसला घाव; भोपळ्यावर बाद झालेल्या बाबर आझमला नेटिझन्सने धुतले

Babar Azam Viral Video : आयपीएल २०२५ सुरु असताना काल पाकिस्तान सुपर लीगला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर बाबर आझमच्या एका व्हायरल व्हिडीओची चर्चा पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

भारतासह जगभरात आयपीएल २०२५ ची धामधुम पाहायला मिळत आहे. आयपीएल सुरु असताना शेजारच्या देशात, पाकिस्तानमध्ये काल ११ मार्च रोजी पीएसएल म्हणजेच पाकिस्तान सुपर लीगला सुरुवात झाली आहे. पीएसएलचे हे दहावे वर्ष आहे. स्पर्धेच्या सुरुवातीलाच एका व्हायरल व्हिडीओमुळे सुपर लीगला ट्रोल केले जात आहे.

पीएसएलमधील पेशावर झल्मी या संघाचे कर्णधारपद बाबर आझमकडे आहे. पीएसएल सुरु होण्यापूर्वी बाबर आझमच्या पेशावर झल्मी संघाच्या व्यवस्थापकांकडून मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या मेजवानीमध्ये बिर्याणीसह नानाविध प्रकारचे पदार्थ असल्याचे पाहायला मिळाते. बाबरसह संघातील इतर खेळाडू मेजवानीतील जेवणावर ताव मारत असल्याचे दिसते.

पेशावर झल्मीच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर या मेजवानीचे, पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले. या व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी खेळाडूंना ट्रोल केले आहे. खास करुन बाबर आझमवर निशाणा साधत लोक ट्रोल करत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या खेळाडूंच्या फिटनेसवरुन टीका केली जात आहे. काहीजण तर या खेळाडूंची तुलना भारतीय खेळाडूंशी करत आहेत.

बाबर आझमच्या नेतृत्वामध्ये आज पेशावर झल्मीने आज क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्धचा सामना रावळपिंडी येथे खेळला. या सामन्यामध्ये पेशावर झल्मीचा ८० धावांनी पराभव झाला. कॅप्टन बाबर आझन आजच्या सामन्यात शून्यावर बाद झाला. यामुळे पुन्हा एकदा बाबर आझमवर टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT