womens asia cup twitter
Sports

U19 Asia Cup: आयुषी शुक्ला चमकली! श्रीलंकेला धोबीपछाड देत टीम इंडियाने गाठली फायनल

Womens U19 Asia Cup, IND vs SL: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये महिला आशिया कप स्पर्धतील ग्रुप ४ फेरीतील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

महिला अंडर १९ एशिया कप स्पर्धेत भारतीय पोरींची दमदार कामगिरी सुरु आहे. या स्पर्धेतील सुपर ४ च्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. या शानदार विजयासह भारतीय संघाने स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या ९९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताने हा सामना ४ गडी राखून शानदार विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आयुषी शुक्ला चमकली. तिने ४ सर्वाधिक ४ गडी बाद केले. या कामगिरीच्या बळावर तिची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

श्रीलंकेचा संघ या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला होता. भारताकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना, २० षटकअखेर ९ गडी बाद ९८ धावा केल्या. या दरम्यान श्रीलंकेकडून नानयाकाराने ३३ धावांची खेळी केली.

तर सुमुदूने ३१ चेंडूंचा सामना करत २१ धावांची खेळी केली. तर सलामीला फलंदाजीला आलेली संजना ९ धावा करत माघारी परतली. हिरुनीने २ धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, आयुषी शुक्लाने सर्वाधिक ४ गडी बाद केले.

आयुषी शुक्लाची शानदार गोलंदाजी

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आयुषी शुक्ला चमकली. तिने ४ षटकात १० धावा खर्च करत ४ गडी बाद केले. या दमदार कामगिरीच्या बळावर तिची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली आहे. परुनिकाने २ गडी बाद केले. यासह धृती आणि शबनम यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

भारतीय संघाची फायनलमध्ये एन्ट्री

या शानदार विजयासह भारताने महिला अंडर १९ आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाकडून कमलिनीने २६ चेंडूंचा सामना करत २८ चेंडूंची खेळी केली. तृशाने २४ चेंडूंचा सामना करत ३२ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT