रविवारी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला. आपल्या घरच्या मैदानावर मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने १६२ रन्सची खेळी केली. यानंतर आरसीबीच्या टीमने १९ व्या ओव्हरमध्येच हे लक्ष्य पार केलं. दरम्यान या सामन्यात दिल्लीने कोणती चूक केली ते पाहूयात.
मीडल ऑर्डरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने फार संथ गतीने फलंदाजी केली. यावेळी पॉवरप्लेमध्ये टीमचा स्कोर ५२ होता तर १५ ओव्हर्सनंतर टीमचा स्कोर केवळ १०८ रन्स होता. म्हणजे ९ ओव्हरमध्ये केवळ ५६ रन्स जोडले गेले.
दिल्ली कॅपिटल्सने कृणाल पंड्याला सेट होण्यासाठी बराच वेळ दिला. यावेळी मिचेल स्टार्कचा दुसरा स्पेल टीमच्या १६ व्या ओव्हरमध्ये देण्यात आला. तोपर्यंत विराट आणि कृणार सेट झाले होते.
या खेळपट्टीवर स्पिनर्सना मदत मिळणार होती. स्वतः अक्षरने ४ ओव्हर्समध्ये १९ रन्स केले. कुलदीपने देखील २८ रन्स खर्च केले. याशिवाय आरसीबीच्या स्पिनर्सने देखील चांगला खेळ केला. असं असून देखील अक्षरने विपराजला एकच ओव्हर दिली.
दोन ओव्हरमध्ये आरसीबीला जिंकण्यासाठी १७ रन्सची गरज होती. यावेळी मिचेल स्टार्कची एक ओव्हर बाकी होती. असं असूनही अक्षरने मुकेशला ओव्हर दिली. मुकेशने ३ ओव्हर्समध्ये ३२ रन्स दिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.