axar patel rishabh pant  instagram/Screengrab
Sports

Rishabh Pant: गोविंदा-गोविंदा! अक्षर अन् पंत तिरुपती बालाजीच्या चरणी! फोटो शेअर करत दिलं हटके कॅप्शन

Rishabh Pant Axar Patel Photo: या दोघांनी आंध्र प्रदेशच्या तिरुपती बालाजी मंदिरात हजेरी लावली आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Ankush Dhavre

Rishabh Pant Axar Patel Photo:

आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्याच्या कारचा अपघात झाला होता. त्यामुळे तो भारतीय संघाकडून खेळताना दिसून येत नाहीये. तर दुसरीकडे अक्षर पटेल (Axar Patel) देखील दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे.

दरम्यान या दोघांनी आंध्र प्रदेशच्या तिरुपती बालाजी मंदिरात हजेरी लावली आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

रिषभ पंत आणि अक्षर पटेल या दोघांनी तिरुपती बालाजीला हजेरी लावली आहे. रिषभ पंतने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर कॅप्शन देत त्याने लिहीले की,'ठिकाणची ऊर्जा व्यक्त करण्यासाठी पुरेसे शब्द नाहीत..' पंत आणि अक्षर पटेलचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत या फोटोला ५ लाखांहुन अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तसेच नेटकरी या फोटोवर कमेंट देखील करताना दिसून येत आहेत. (Tirupati Balaji Temple)

रिषभ पंतचा कार अपघात झाल्यानंतर तो गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. आता तो पूर्णपणे फिट होण्याच्या वाटेवर आहे. जो जिममध्ये फिटनेस ट्रेनिंग करत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

तो नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. तर डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. (Latest sports updates)

अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली होती. मात्र दुखापतीमुळे त्याला भारतीय संघातून बाहेर करण्यात आलं होतं. दरम्यान त्याच्याऐजवजी आर अश्विनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

भारताला धमकावणारे ट्रम्प रशियाच्या पुतिनसमोर शांत; 'पीसमेकर' प्रतिमेला धक्का, भेटीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT