Rishabh Pant Batting: आता काय खरं नाय! वर्ल्डकपपूर्वी रिषभ पंत उतरला मैदानात; चौफेर फटकेबाजी करतानाचा VIDEO व्हायरल

Rishabh Pant Batting Video: भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज रिषभ पंत मैदानावर येऊन तुफान फटकेबाजी करताना दिसून आला आहे.
rishabh pant viral video
rishabh pant viral video saam tv
Published On

Rishabh Pant:

भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज रिषभ पंत हा २०२२ मध्ये झालेल्या कार अपघातात गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. या अपघातानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्याची दुखापत पाहता असं म्हटलं जात होतं की,त्याला मैदानावर कमबॅक करण्यासाठी कितीतरी वर्ष लागतील.

मात्र आता क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रिषभ पंत मैदानावर येऊन फटकेबाजी करताना दिसून आला आहे.

rishabh pant viral video
Ben Stokes Comeback: आधी वनडेतून संन्यास, माघार अन् आता संघात थेट मोठी जबाबदारी; NZ विरुद्धच्या मालिकेसाठी बेन स्टोक्सला संधी

रिषभ पंतच्या फलंदाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिषभ पंत मैदानावर येऊन चौफेर फटकेबाजी करताना दिसून येत आहे.

इतके महिने मैदानाबाहेर असुनही कमबॅक केल्यानंतर त्याच्या फलंदाजीत तिच धार पाहायला मिळत आहे. सध्या तो नॅशनल क्रिकेट अॅकेडमीत रिहॅबची प्रक्रिया पुर्ण करतोय.

वर्ल्डकपपूर्वी रिषभ पंतचे कमबॅक ही भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बाब आहे. मात्र त्याला आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकपRisa स्पर्धेसाठी संधी मिळणं कठीण आहे. या वर्षाच्या शेवटी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे.

जर तो पुर्णपणे फीट असेल तर तो या मालिकेतून कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. जर त्याला या मालिकेतून कमबॅक करण्याची संधी मिळाली नाही तर त्याला भारतात होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी संधी दिली जाऊ शकते. (Latest sports updates)

पंतच्या अनुपस्थितीत ईशान किशनवर मोठी जबाबदारी...

रिषभ पंत दुखापतग्रस्त झाल्यानंतर केएस भरतला भारतीय कसोटी संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी दिली गेली होती. मात्र त्याला या संधीचा फायदा घेता आला नव्हता. संधी मिळूनही त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. तर वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये ही जबाबदारी ईशान किशनवर सोपवण्यात आली होती. ईशानने मिळालेल्या संधीचा दोन्ही हातांनी स्विकार करत दमदार कामगिरी केली. आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी देखील त्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान दिले जाऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com