Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Hina Khan On Mrunal-Bipasha : बिपाशा बसूवरील जुन्या टिप्पणीबद्दल मृणाल ठाकूरने माफी मागितली आहे. मृणालच्या माफीनंतर हिना खान म्हणाली की, प्रत्येकजण चुका करतो.
Hina Khan On Mrunal-Bipasha
Hina Khan On Mrunal-BipashaSaam tv
Published On

Hina Khan On Mrunal-Bipasha : बिपाशा बसूवरील एका जुन्या कमेंटमुळे मृणाल ठाकूर चर्चेचा विषय बनली आहे. तिचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये मृणाल ठाकूर बिपाशा बसूच्या शरीराबद्दल बोलताना दिसत आहे. ती म्हणते की ती बिपाशापेक्षा खूपच चांगली आहे. तसेच तिने बिपाशासाठी पुरुषी स्नायू असलेली मुलगी असा शब्द वापरला. गुरुवारी मृणालने या कमेंटबद्दल माफी मागितली. आता हिना खानने माफी मागितल्यानंतर मृणालला पाठिंबा दिला आहे. मृणालने तिची चूक मान्य केल्याचा तिला अभिमान आहे असे तिने म्हटले आहे.

हिनाने मृणालसाठी एक पोस्ट लिहिली

हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. तिने लिहिले, ज्ञान हे ज्ञानाच्या झाडाचे फळ आहे जे अनुभवांमध्ये रुजलेले आहे. आपले सामाजिक कौशल्य, संवाद आणि समजुतीची खोली काळानुसार येते. आपण सर्वजण चुका करतो, विशेषतः जेव्हा आपण तरुण असतो. मी मृणालला समजू शकते. मीही भूतकाळात अशा मूर्ख चुका केल्या आहेत."

Hina Khan On Mrunal-Bipasha
Coolie VS War 2 Box Office Collection: 'कुली' आणि 'वॉर 2' मध्ये कांटे की टक्कर; दुसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

हिना खान काय म्हणाली

हिना खान पुढे लिहिते, "आपल्यापैकी बरेच जण खूप चुका करतात, पण ते हाताळण्याचे कौशल्य सगळ्यांमध्येच नसते. पण काळाबरोबर आपण बदलतो, आपण दयाळू, करुणामय बनतो.

Hina Khan On Mrunal-Bipasha
Param Sundari: सिद्धार्थ-जान्हवीचा 'परम-सुंदरी' वादाच्या भोवऱ्यात, एका सीनमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी, वाचा नेमकं प्रकरण

हिनाने बिपाशाचेही कौतुक केले आहे

मृणालसोबत, हिना खानने तिच्या स्टोरीत बिपाशा बसूचेही कौतुक केले आहे. तिने लिहिले आहे की बिपाशा आणि मृणाल दोघीही उत्तम महिला आहेत. तिने म्हटले आहे की बिपाशा सगळ्यांसाठी प्रेरणा आहे. मृणालने तिची चूक स्वीकारली याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com