Coolie VS War 2 Box Office Collection: 'कुली' आणि 'वॉर 2' मध्ये कांटे की टक्कर; दुसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

Coolie VS War 2 Box Office Collection Day 2: बॉक्स ऑफिसवर रजनीकांत आणि हृतिक रोशन यांच्यात जोरदार स्पर्धा सुरू आहे. रजनीकांतचा 'कुली' आणि हृतिकचा 'वॉर २' एकाच दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
War 2 VS Coolie Box Office Collection Day 2
War 2 VS CoolieSAAM TV
Published On

Coolie VS War 2 Box Office Collection Day 2: गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'कुली' चित्रपटाची चर्चा होती. या चित्रपटात रजनीकांत यांना अॅक्शन मोडमध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. हा चित्रपट गुरुवारी म्हणजेच १४ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटासोबतच, हृतिक रोशनचा 'वॉर २' देखील गुरुवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'वॉर २' हा चित्रपट यश राज स्पाय युनिव्हर्सचा चित्रपट असून हा वॉरचा सिक्वेल आहे. या चित्रपटातून ज्यूनियर एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांमध्ये कडक स्पर्धा असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, रजनीकांत आणि हृतिक रोशनच्या चित्रपटाचा दुसऱ्या दिवसाचा कलेक्शन समोर आला आहे. तर जाणून घेऊया कोण कोणाच्या पुढे गेले?

War 2 VS Coolie Box Office Collection Day 2
Maharashtrachi Hasyajatra: एक नंबर, तुझी कंबर...; 'शेकी शेकी' गाण्यावर शिरकली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम, VIDEO व्हायरल

'कुली'ने अवघ्या दोन दिवसांत १०० कोटी पार

रजनीकांत यांच्या 'कुली' हा चित्रपट लोकेश कनागराज यांनी दिग्दर्शित केला आहे. रजनीकांत यांच्या व्यतिरिक्त, या चित्रपटात नागार्जुन, श्रुती हसन आणि आमिर खान यांचे खास कॅमिओ आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'कुली'चे बजेट ३५० कोटी रुपये आहे. त्याच वेळी, रजनीकांत यांनी यासाठी २०० कोटी रुपये फी घेतली आहे. 'कुली'ने पहिल्या दिवशी ६५ कोटी रुपये कमावले आहेत. आता, दुसऱ्या दिवसाशी 'कुली'ने ५३.५० कोटी रुपये कमावले आहेत. अशाप्रकारे, भारतीय बॉक्स ऑफिसवर 'कुली'ने दोन दिवसात ११८ कोटी ५० लाख रुपये कमवले आहे.

War 2 VS Coolie Box Office Collection Day 2
Serial TRP: 'ठरलं तर मग' की 'थोड तुझ थोड माझं'; टीआरपीच्या शर्यतीत कोणी मारली बाजी?

'वॉर २' ने देखील अवघ्या दोन दिवसांत १०० कोटी पार

'वॉर २' मध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरसह कियारा अडवाणी, टायगर श्रॉफ, आशुतोष राणा सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'कुली'चे बजेट ४०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. 'वॉर २' ने पहिल्या दिवशी ५१.५ कोटी रुपयांची कमाई केली. तर, दुसऱ्या दिवशी 'कुली' ने ५६.५० कोटी रुपये कमावले आहेत. अशाप्रकारे, भारतीय बॉक्स ऑफिसवर 'वॉर २'चे एकूण कलेक्शन १०८ कोटी रुपये झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com