...अन्यथा माझ्यासारखे दहाजण ऑलिम्पिकमध्ये खेळले असते- अविनाश साबळे विनोद जिरे
Sports

...अन्यथा माझ्यासारखे दहाजण ऑलिम्पिकमध्ये खेळले असते- अविनाश साबळे

टोकियो ऑलिम्पिक खेळणाऱ्या अविनाश साबळेंनी साम टिव्हीशी बोलतांना व्यक्त केला अनुभव

विनोद जिरे

बीड जिल्ह्यातील (Beed District) तरूणांमध्ये खूप मोठे टॅलेंट आहे, ते खूप काही करू शकतात. मात्र क्रीडा विभागात (Sports Department) खूप मोठा सुविधांचा अभाव आहे. हा भाव जर पूर्ण झाला, तर माझ्यासारखा एक जण ऑलिम्पिकमध्ये खेळणार नाही तर जिल्ह्यातून 10 जण ऑलम्पिक मध्ये खेळतील. अशी खंत आणि विश्वास टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलेल्या, अविनाश साबळे यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या कार्यक्रमातील जाहीर भाषणातून व्यक्त केली आहे.

तो पुढे म्हणाले, ऑलिम्पिक हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न आहे. ज्यावेळेस तो एखादा खेळ खेळतो, त्यावेळेस त्याचं स्वप्न असतं एकदा ऑलिम्पिक खेळायचे, माझंही तसंच स्वप्न होतं. ऑलिम्पिक खेळायचा आणि पदक जिंकायचं. मी खूप प्रयत्न केले, मेहनत देखील चांगली होती, मात्र लास्ट टाईमिंगला मला covid-19 झाला आणि माझ्या प्रॅक्टिसवर मोठा परिणाम झाला. एवढं होऊनही मी माझा बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला. मी यावेळेस जे पदक जिंकू नाही शकलो, ते पुढच्या वेळेस नक्की जिंकेल, असा विश्वास मला आहे. सर्व भारतीयांना माझ्याकडून अपेक्षा होत्या, मात्र पुढच्या वेळेस मी सर्व भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करेल. असा विश्वास देखील यावेळी ऑलम्पिक पट्टू अविनाश साबळे यांनी व्यक्त केला.

दरम्यान जिल्ह्यातील खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडून दरवर्षी लाखोंची उधळपट्टी केली जाते. मात्र प्रत्यक्षात बीड जिल्ह्यातील खेळाडूंना सुविधा मिळत नसल्याची ओरड स्थानिक खेळाडूतून होती. मात्र आज जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात, ऑलिम्पिकपटू अविनाश साबळे यांनी, क्रीडा कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा अभाव आहे. अशी खंत व्यक्त केल्याने कार्यक्रमासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या देखील भुवया उंचावल्या होत्या. तर यावेळी तेथे आलेल्या एका शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्याने यावर बोलू नका. असा सल्ला देखील अविनाश साबळे यांना दिला. यामुळे या क्रीडा आणि शिक्षण विभागातील सावळा गोंधळ समोर आला आहे..

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

SCROLL FOR NEXT