ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा पराभव करत वर्ल्ड कप 2025 सेमीफायनलमध्ये धडक
एलिसा हीलीने शानदार 113 नाबाद धावा कुटल्या
ऑस्ट्रेलियाने ५ पैकी ४ सामने जिंकले
बांगलादेशकडून रुबिया हैदर आणि शोभानाने चांगली फलंदाजी केली
आयसीसी वुमेन्स वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशमध्ये सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर १० विकेट राखून पराभव केला. या विजयानं ऑस्ट्रेलियानं विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये स्थान पक्क झालं आहे. ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यापैकी ४ सामने जिंकले आहेत. तर पावसामुळे एक सामना ड्रॉ झाला.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून ५० षटकात १९८ धावा केल्या. बांगलादेश रुबिया हैदर आणि शोभाना यांनी चांगली कामगिरी केली.ऑस्ट्रेलियाकडून गार्डनर, सदरलँड, किंग आणि जार्जियाने प्रत्येकी २-२ विकेट घेतले.
बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रलियाने १० गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने एलिसा हीलीने नाबाद ११३ धावा कुटल्या. तिने २० चौकार लगावले. तर लिचफिल्डने ८४ नाबाद धावा कुटल्या. लिचफिल्डने १२ चौकार आणि १ षटकार लगावला.
आतापर्यंत विश्चचषक स्पर्धेत १७ सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत ५ सामन्यापैकी ४ सामने जिंकून सेमीफायनलमध्ये जागा पक्की केली. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमाकांवर इंग्लंड संघ आहे. इंग्लंडने ४ सामन्यापैकी ३ सामने जिंकले आहेत. इंग्लंडजवळ आता ७ गुण आहेत. तर या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे.
भारत चौथ्या स्थानावर आहे. भारताने ४ सामन्यापैकी २ सामने जिंकले आहेत. न्यूझीलंड संघाने ४ सामन्यापैकी १ सामना जिंकला आहे. बांगलादेशने ५ सामन्यापैकी १ सामना जिंकला आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानला आतापर्यंत एकही सामना जिंकता आला नाही. पाकिस्तान क्रमवारीत शेवटच्या स्थानावर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.