भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा टी-२० सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 48 रन्सने पराभव केला आहे. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या सिरीजमध्ये २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांसमोर कांगारूंच्या फलंदाजांनी अक्षरः गुडघे टेकले. सिरीजमधील शेवटचा सामना ८ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. यावेळी टीम इंडियाने फलंदाजी करत 168 रन्सचं लक्ष्य दिलं. हे लक्ष्य पूर्ण करताना संपूर्ण कांगारूंची टीम 119 रन्सवर गारद झाली.
ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात मिचेल मार्श आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी केली. दोघांनी सुरुवातीला चांगली पार्टनरशिप केली. मात्र पाचव्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने शॉर्टला 25 रन्सवर बाद करत पहिला झटका दिला. यानंतर नवव्या ओव्हरमध्ये अक्षरने इंग्लिशला बाद करत दुसरा झटका दिला. त्या वेळी ऑस्ट्रेलियाचा स्कोर 67 रन्स असा होता.
दहाव्या ओव्हरमध्ये शिवम दुबेने कर्णधार मार्शला 30 रन्स र बाद केलं. बाराव्या ओव्हरमध्ये दुबेने टिम डेविडला 14 रन्सवर बाद करत आणखी एक महत्त्वाचा विकेट घेतली. अर्शदीप सिंगने फिलिपला बाद केलं आणि स्कोर 98 रन्सवर पोहोचला होता.
पंधराव्या ओव्हरमध्ये वरुण चक्रवर्तीने मॅक्सवेलला बोल्ड करत सहावा झटका दिला. यानंतर कांगारूंचे फलंदाज ढेपाळत गेले. वॉशिंग्टन सुंदरने स्टोइनिसला बाद केलं आणि त्याच ओव्हरमध्येही बार्टलेटलाही बाद करत दोन विकेट्स घेतल्या. अठराव्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने ड्वार्शुइसला बोल्ड करत आपली पहिली विकेट मिळवली. शेवटचा विकेटही सुंदरने घेतला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 119 रन्सवर संपुष्टात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.