Women's World Cup 2025: भारताच्या लेकी वर्ल्ड चॅम्पियन्स; हरमनप्रीतच्या टीम इंडियानं रचला इतिहास

Women’s World Cup 2025: भारताच्या वाघिणींनी नवा इतिहास रचलाय. क्रिकेटमधली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची मक्तेदारी मोडीत काढत भारताच्या महिला क्रिकेटपट्टूंनी वर्ल्ड कपवर नाव कोरलंय. टीम इंडियाचा हा विजय महिला क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची नांदी कशी ठरलाय? पाहूयात.
Women’s World Cup 2025
Team India lifts the ICC Women’s World Cup trophy — a historic first under captain Harmanpreet Kaur’s leadership.saam tv
Published On
Summary
  • शेफाली वर्माची 87 धावांची फटकेबाजी,

  • दिप्ती शर्माची 58 धावा आणि 5 विकेटची ऑलराऊंडर खेळी

  • भारताच्या लेकींवर देशभरात कौतुकाचा वर्षाव

राजीव कसले, साम प्रतिनिधी

महिला टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने वर्ल्ड कप उचचला आणि संपूर्ण देशात एकच जल्लोष झाला. हा विजय केवळ महिला टीम इंडियाचा नव्हे तर 140 कोटी भारतीयांचा आहे. हा विजय नव्या पिढीसाठी प्रेरणा देणारा ठरलाय.1983ला कपिल देवच्या टीम इंडियाने जो इतिहास क्रिकेटच्या मैदानात रचला होता, तसाच इतिहास हरमनप्रीतच्या महिला टीमने 2025 मध्ये रचलाय. भारताच्या लेकींनी महिला क्रिकेटमधली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची मक्तेदारी मोडीत काढत नव्या चॅम्पियन बनल्यात.

सेमीफायनलमध्ये जेमिमाच्या 127 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने सात वेळा वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. आता वेळ होती फायनलची, तो दिवस उजाडला. संपूर्ण देशाचं भारताच्या लेकींच्या कामगिरीवर लक्ष होतं. क्रिकेटप्रेमींची पावलं नवी मुंबईच्या डी व्हाय पाटील स्टेडिअमकडे वळली. होम हवन करत महिला टीम इंडियाच्या विजयाची प्रार्थना करण्यात येत होती. पण पावसाने खोडा घातला आणि सामना उशीराने सुरु झाला.

पावसाच्या खेळीनंतर डी व्हाय पाटील स्टेडिअमवर हरमनप्रीतच्या महिला टीमचं वादळ घोंगावलं आणि यात दक्षिण आफ्रिकेची टीम पालापाचोळ्यासारखी उडून गेली. शेफाली वर्माची 87 धावांची फटकेबाजी, दिप्ती शर्माची 58 धावा आणि 5 विकेटची ऑलराऊंडर खेळी आणि याला मिळालेली हरमनप्रीतच्या चाणाक्ष निर्णयाची साथ या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवला.

भारताच्या लेकींवर देशभरात कौतुकाचा वर्षाव होतोय, या ऐतिहासिक विजयामुळे देशाचं नाव उंचावलंय असं म्हणत सचिन तेंडुलकरने कौतुकाची थाप दिली. तर आभाळकडे पाहात रोहित शर्मा भाऊक झाल्याचं दिसलं. ऐतिहासिक विजयानंतर खेळाडूंना अश्रु अनावर झाले. हरमनप्रीत आणि स्मृती मंधाना एकमेकांना मिठी मारत प्रचंड भाऊक झाल्या. हरमनप्रीतने भांगडा करत जय शहांकडून ट्रॉफी स्विकारली आणि टीम इंडियाने अनोख्या स्टाईलने विजयाचा जल्लोष साजरा केला.

टीम इंडियाने याआधी 2005 आणि 2017 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण उपविजेत्यापदावरच समाधान मानावं लागलं होतं.ही कमी हरमनप्रीतने भरुन काढलीय.हा विजय केवळ क्रिकेट या खेळातला नव्हे तर सामाजिक परिवर्तनाला चालना देणारा विजय ठरणार आहे. जसा ८३च्या विजयानंतर देशातल्या घराघरात मुलांना क्रिकेटपटू करण्याचं स्वप्न पाहिलं गेलं.तसंच या विजयानंही आई-वडिलांना आपल्या मुलीच्या हातात बॅट देण्याचं मोठं स्पप्न दाखवलंय यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com