aus vs pak twitter
Sports

AUS vs PAK Semi Final: आज रंगणार ऑस्ट्रेलिया-पाकिस्तानात दुसऱ्या सेमीफायनलचा थरार! टीम इंडियासोबत फायनलमध्ये कोण भिडणार?

ICC Under 19 World Cup 2023: अंडर १९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आज दुसऱ्या सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

ICC Under 19 World Cup 2024, Australia vs Pakistan Semi Final:

अंडर १९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आज दुसऱ्या सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होणार आहे.

स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे हा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात जेतेपदासाठी भारतीय संघाचा सामना करताना दिसून येईल.

ऑस्ट्रेलिया - पाकिस्तानात रंगणार सेमीफायनलचा थरार..

आंतरराष्ट्रीय स्तरावर नसीम शाह हा पाकिस्तान संघासाठी दमदार कामगिरी करतोय. तर त्याचा धाकटा भाऊ उबेद शाह त्याच्या पावलांवर पाऊल ठेवत अंडर १९ वर्ल्डकपमध्ये धुमाकूळ घालतोय. हा सामना जिंकणारा संघ भारतीय संघासोबत फायनलचा सामना खेळताना दिसून येईल. भारतीय संघाने नवाव्यांदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यासह भारतीय संघ सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

यापूर्वी २००६ मध्ये झालेल्या अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. या संघात रविंद्र जडेजा, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारासारखे दिग्गज खेळाडू होते. मात्र सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने भारतीय संघाला धूळ चारली होती. (Cricket news in marathi)

कोण कोणावर भारी?

बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानने शानदार विजय मिळवला होता. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी या स्पर्धेतील एकही सामना गमावलेला नाही. त्यांनी इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशसारख्या संघांना पराभूत केलं आहे. मात्र बाद फेरीतील सामन्यात कोण कोण भारी पडणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: फक्त जास्त मीठानेच ब्लड प्रेशर वाढत नाही; साध्या वाटणाऱ्या या 6 सवयीही ठरतायत कारणीभूत

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT