australia twitter
Sports

Australia Squad: बॉर्डर- गावसकर मालिका जिंकताच ऑस्ट्रेलियाने कर्णधार बदलला; या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

Australia Squad For Sri Lanka Tour: श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला ३-१ ने पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेतील विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला.

आता ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघातून कर्णधार पॅट कमिन्सला वगळण्यात आलं आहे. तर स्टीव्ह स्मिथकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपदाची जबाबदारी

ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. या मालिकेसाठी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आली आहे. तर ट्रेविस हेडकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भारतीय संघाविरुद्ध झालेल्या मालिकेसाठी मॅकस्विनीला संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याला प्लेइंग ११ मधून बाहेर करण्यात आलं होतं. आता श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे.

यासह भारतीय संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही तो वेगवान गोलंदाजी आक्रमणाचं नेतृत्व करताना दिसेल. यासह मिचेल स्टार्क आणि शॉन अबॉटला देखील संघात स्थान देण्यात आलं आहे. सिडनी कसोटीत पदार्पण करणाऱ्या ब्यू वेबस्टरला देखील या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ:

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स केरी, कूपर कॉनॉली, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुहनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, नॅथन मॅकस्विनी, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Women: महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढला; वेळीच जाणून घ्या हे Facts, अन्यथा...

Maharashtra Live News Update: अतिवृष्टीची मोजणी करण्यासाठी स्कायमेट कुठून शेतकऱ्यांची दिशाभूल

Kolhapur : बेल्ट, बॅट, दांडक्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण हॉस्टेलमध्ये भयंकर प्रकार, मारहाणीचे Video समोर

Diwali Fort Making : दिवाळीत बच्चे कंपनीसोबत बनवा भव्य किल्ला, 'अशी' करा सजावट

IPS अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, DGP सह १४ जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT