Sports

Aaron Finch Retirement: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज एरॉन फिंचचा क्रिकेटला रामराम; पहिला T20 विश्वचषक जिंकवून देण्याचा केला होता पराक्रम

एरॉन फिंचने तब्बल १२ वर्षे ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेटचं मैदान गाजवले.

Gangappa Pujari

Aaron Finch: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला पहिला आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार एरॉन फिंच यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यानं एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्यानं सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. ( Australia)

फिंचची कारकिर्द...

एरॉन फिंचने तब्बल १२ वर्षे ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेटचं मैदान गाजवलं. मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक आहे.

फिंचने आपल्या कारकिर्दीत पाच कसोटी, 146 एकदिवसीय आणि 103 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 76 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारा तो एकमेव ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. त्याने 103 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34.28 च्या सरासरीने धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेटही १४२.५ होता.

निवृत्तीनंतर दिली अशी प्रतिक्रिया...

"२०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपर्यंत खेळत राहणं आपल्याला जमणार नाही याची जाणीव मला झाली. त्यामुळं निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे असं मला वाटतं. मी वेळीच निर्णय घेतल्यामुळं संघाला नवीन खेळाडूंच्या निवडीसाठी आणि आगामी स्पर्धेच्या तयारीसाठी वेळ मिळेल," अशी प्रतिक्रिया फिंचने निवृत्तीनंतर दिली आहे.

2018 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्याने 76 चेंडूत 172 धावा करत एक वेगळा विक्रम केला होता. टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करण्याचा मान फिंचला मिळाला आहे. पण आता फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारतासोबतच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लोकसभेत गदारोळ, कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब

HBD Dhanush : साऊथचा किंग धनुष किती कोटींचा मालक? संपत्तीचा आकडा वाचून डोळे भिरभिरतील

एकनाथ खडसेंवर मुलाच्या हत्येचा आरोप, निखिलसोबत त्यावेळी काय झालं होतं? रोहिणी खडसेंनी सगळंच सांगितलं

Today Gold Rate: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमतीत बदल झाला का? वाचा आजचे दर

Shravan Somwar: श्रावणातील पहिल्या सोमवारी शंकरासाठी हे उपाय नक्की करा; मनातील प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

SCROLL FOR NEXT