
Mumbai Threat Update News : मुंबईमध्ये हल्ला केला जाईल अशी पुन्हा एक धमकी आली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर हा धमकीचा फोन आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअरपोर्ट कॉन्टेक सेंटरच्या संकेत स्थळावर सोमवारी १० च्या सुमारास हा धमकीचा फोन आला होता. (Latest Mumbai Threat News)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव इरफान अहमद शेख असे सांगितले. फोनवरील व्यक्तीने इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा उल्लेख केला. तसेच फोन कॉलवर त्याने संशयास्पद कोड भाषेत संवाद साधत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर आता संपूर्ण तपास यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी सहार पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात ५०५(१) भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.