australia enters semi final champions trophy 2025 Saam Tv News
Sports

AFG vs AUS : पावसामुळे ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये दाखल, अफगाणिस्तानला अजूनही संधी; पण...

AFG vs AUS Match Washed Out Due to Rain : ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचला असला तरी अफगाणिस्तानची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता अजूनही कायम आहे. सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला.

Prashant Patil

लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलच्या दृष्टीने अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना खूप महत्त्वाचा होता. या सामन्याचा विजेता संघ ब गटातून चॅम्पियन्स ट्रॉफी उपांत्य फेरीत जाणारा पहिला संघ ठरणार होता. पण अफगाणिस्तानची फलंदाजी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावात १२ षटके होताच पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलियाचा सामना पाऊस पडल्याने रद्द करण्यात आला. पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर बराच वेळ थांबून मैदान सामन्यासाठी पुन्हा तयार होतं की नाही, याचं पंचांनी निरिक्षण केलं. पण लाहोरच्या या मैदानावर प्रचंड पाणी असल्याने सामना रद्द करण्यात आला. भारतीय वेळेनुसार रात्री ९.२० वाजता पंचांनी सामना रद्द केल्याची घोषणा केली. या निकालाचा अर्थ ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. त्याचवेळी अफगाणिस्तान संघ अजूनही उपांत्य फेरीत पोहोचू शकतो.

ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचला असला तरी अफगाणिस्तानची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता अजूनही कायम आहे. सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला. ऑस्ट्रेलिया सर्वाधिक ४ गुणांसह पात्र ठरली, तर अफगाणिस्तानचा संघ ३ गुण तर दक्षिण आफ्रिकेचा संघही ३ गुणांसह शर्यतीत आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानला आता उद्या म्हणजेच १ मार्च २०२५ रोजी इंग्लंडने विजय मिळावा अशी अपेक्षा असेल, जेणेकरून दक्षिण आफ्रिकेचा रन रेट कमी होईल आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात ऊस दरासाठी असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलकांना धक्काबुक्की

Methi Thepla Recipe : नाश्त्यासाठी बनवा गुजरात स्पेशल मेथी थेपला, झटपट तयार होते रेसिपी

मुंबईत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आता राजकीय दबावाचा नवा वाद, नेमकं काय घडलं?

Success Story: लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलं, आजीने मोठं केलं, सलग ५ वेळा अपयश, ६व्या प्रयत्नात IPS; अंशिका जैन यांचा प्रवास

Oldest Forts In India: भारतातील सगळ्यात जूने किल्ले कोणते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT