Australia cricket team yandex
क्रीडा

Mitchell Starc: वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ICC वर भडकला

Mitchell Starc On ICC: ऑस्ट्रेलियाला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर मिचेल स्टार्कने आयसीसीवर मोठा आरोप केला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील जेतेपदावर नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ सेमिफायनलमध्ये प्रवेश करता आला नव्हता. दरम्यान या संघातील वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आता आपल्याच टीम मॅनेजमेंटवर जोरदार टिका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सिडनी मॉर्निंग हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'टीम मॅनेजमेंटने अॅश्टन एगरवर विश्वास दाखवला. कारण या मैदानावर गेल्या सामन्यात फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी फिरकी गोलंदाजी उत्तमरित्या खेळून काढली. त्यांनी परिस्थिती समजून घेतली. यादरम्यान आम्ही काही चूका केल्या, ज्याचा आम्हाला फटका बसला.'

ICC ला सुनावले खडेबोल

मिचेल स्टार्कने टीम मॅनेजमेंटसह आयसीसीवरही निशाणा साधला आहे. या स्पर्धेतील काही सामने दिवसा, तर काही सामने रात्रीच्या वेळी खेळवण्यात आले होते. त्यामुळे मिचेल स्टार्कने स्पर्धेच्या वेळापत्रकावरुन नाराजी व्यक्त केली आहे. मिचेल स्टार्क म्हणाला की, 'ग्रुप स्टेजमध्ये आम्ही इंग्लंडपेक्षा पुढे होतो आणि अचानक आम्ही दुसऱ्या ग्रुपमध्ये आलो. आम्हाला २ सामने रात्री खेळायचे होते आणि तिसरा सामना दिवसा खेळायचा होता. त्यामुळे आम्हाला पूर्ण तयारी करता आली नाही. आम्ही सामन्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. आमची फ्लाईट उशीरा होती आणि हॉटेलपासून विमानतळ दीड तासांच्या अंतरावर होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्हाला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरायचं होतं.'

ऑस्ट्रेलियाला आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये प्रवेश करता आला नव्हता. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियावर २१ धावांनी विजय मिळवला होता. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर भारतीय संघाविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ सेमिफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले यांचा १ लाख ४१ हजार मतांनी विजयी

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT