India vs Australia semi final saam tv
Sports

IND vs AUS Semifinal: "...तर तिला रोखणं कठीण", भारताविरूद्धच्या सेमीफायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला सतावेतय 'या' खेळाडूची भीती

India vs Australia semi final: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप आता रंगतदार टप्प्यावर आला आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सामना टीम इंडियाशी होणार असून, हा सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वुमेंस क्रिकेट वर्ल्डकप २०२५ चा दुसरा सेमीफायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार मेग लॅनिंग हिने एक मोठी चिंता व्यक्त केली आहे. या सामन्यापूर्वी तिला हरमनप्रीत कौरच्या फॉर्मची चिंता सतावतेय.

हरमनप्रीत कौर ही ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटा

मेग लॅनिंगला वाटतं की, हरमनप्रीत कौरची बॅट अजून शांत आहे. मात्र जर ती एकदा फॉर्मात आली, तर तिला थांबवणं अशक्य होईल. लॅनिंगच्या या भीतीमागे एक ठोस कारण आहे ते म्हणजे २०१७च्या वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७१ नाबाद रन्स करत भारताला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. त्या सामन्याची आठवण अजूनही ऑस्ट्रेलियाच्या टीमला अस्वस्थ करते.

मेग लॅनिंगने काय म्हटलं?

आयसीसीसोबतच्या बोलताना लॅनिंग म्हणाली, “भारतासमोर आमच्यासाठी सर्वात मोठा धोका म्हणजे त्यांची कर्णधार हरमनप्रीत कौर. अजूनपर्यंत तिच्या बॅटने फारसा चांगला खेळ केलेला नाही. पण सेमीफायनल सामन्यासारख्या मोठ्या क्षणी ती आपला सर्वोत्तम खेळ दाखवू शकते. एकदा ती फॉर्मात आली, तर तिला रोखणं कठीण होईल. ती भारतासाठी सर्वात महत्त्वाची खेळाडू आहे.”

टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कशी पोहोचली?

भारतीय महिला टीमने लीग टप्प्यातील सातपैकी तीन सामने गमावले. ज्यामध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडूनही पराभव स्विकारावा लागला आहे. मात्र चौथ्या स्थानावर राहून त्यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आता घरी खेळताना, टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलमध्ये पोहोचण्याचा निर्धार करतेय. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारत वनडे वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पाहतोय.

हरमनप्रीतचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स

या वर्ल्डकप हरमनप्रीतने सहा सामन्यांतील पाच डावांमध्ये १४१ रन्स केले आहेत. इंग्लंडविरुद्धची ७० रन्सची खेळी तिची सर्वोत्तम कामगिरी ठरलीये. आता सेमीफायनलच्या सामन्यात ती कोणता धमाका करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kala Chana Chaat Recipe : कांदा-लसूण न घालता झटपट बनवा ढाबा स्टाइल गरमागरम 'काळा चणा मसाला', वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: विक्रोळीत शॉपिंग सेंटरला जवळच्या मीटर बॉक्सला लागली भीषण आग

Rules flouted by police: नियम धाब्यावर? एकाच बाईकवरून तीन पोलिसांचा प्रवास; Video Viral होताच लोक संतापले

Ambernath Politics: अंबरनाथच्या राजकारणाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा, भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली, शिंदेंनी डाव टाकला, काय घडलं?

Ind vs NZ playing 11 : न्यूझीलंडविरुद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? रोहित शर्मा, विराट कोहली खेळणार का? कोण बसेल बाकावर?

SCROLL FOR NEXT