AUS vs SCO, Highlights: हेड स्कॉटलंडसाठी ठरला 'डोकेदुखी'! ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लंडचा सुपर ८ मध्ये प्रवेश
aus vs scot twitter
क्रीडा | T20 WC

AUS vs SCO, Highlights: हेड स्कॉटलंडसाठी ठरला 'डोकेदुखी'! ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लंडचा सुपर ८ मध्ये प्रवेश

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील ३५ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना स्कॉटलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली. मात्र शेवटी ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. या विजयासह ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी कायम आहे. तर स्कॉटलंडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला असून इंग्लंडने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी १८१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. डेव्हिड वॉर्नर स्वस्तात माघारी परतला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड आणि मार्कस स्टोइनिसने ८० धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला दमदार कमबॅक केलं.

ट्रेविस हेड ४९ चेंडूंचा सामना करत ६७ धावांची खेळी करत माघारी परतला. तर मार्कस स्टोइनिसने २९ चेंडूंचा सामना करत ५९ धावांची खेळी केली. शेवटी टीम डेव्हिडने १४ चेंडूंचा सामना करत २८ धावांची खेळी केली. त्याने शेवटी षटकार मारत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत स्कॉटलंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. या आमंत्रणाचा स्विकार करत प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या स्कॉटलंडने २० षटकअखेर ५ गडी बाद १८० धावा केल्या.या संघाकडून फलंदाजी करताना ब्रेंडन मॅक्मुलेनने २४ चेंडूंचा सामना करत ६० धावांची खेळी केली. तर कर्णधार रिची बेरिंगटनने ३१ चेंडूंचा सामना करत ४२ धावांची खेळी केली. सलामीवीर जॉर्ज मुन्सीने २३ चेंडूंचा सामना करत ३५ धावा चोपल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreya Bugde: श्रेया बुगडेची पतीसोबत जम्मू काश्मीर स्वारी, Photos पाहा

Worli Hit And Run Case: अडीच वर्ष काय घडलं सांगू का? आता राजकारण नको; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता इशारा

Hingoli News : हिंगोलीत शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडलं; तांत्रिक अडचण दूर होत नसल्याने शेतकरी आक्रमक

Electric Shock Safety: पावसात विजेचा झटका लागू नये यासाठी काय करावे? विद्युत सुरक्षेसाठी वीज कंपन्याचा काय आहे सल्ला?

Shiv Stuti : महादेवाच्या अराधनेने दूर होईल आर्थिक संकट; आजपासून पूजेमध्ये करा हे बदल

SCROLL FOR NEXT