AUS vs SCO, Mitchell Marsh: स्कॉटलंडकडून पराभव झाला तर मिचेल मार्शवर लागणार २ सामन्यांचा बॅन! वाचा काय आहे कारण?

ICC Gave Warning To Mitchell Marsh: ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी आयसीसीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शला वॉर्निंग दिली आहे.
AUS vs SCO, Mitchell Marsh: स्कॉटलंडकडून पराभव झाला तर मिचेल मार्शवर लागणार २ सामन्यांचा बॅन! वाचा काय आहे कारण?
australian cricket teamtwitter

ऑस्ट्रेलियाचा संघ टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी करतोय. बुधवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाला नमवत सुपर ८चं तिकीट मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना स्कॉटलंडविरुद्ध होणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंडपेक्षा इंग्लंडसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा संघ जर या सामन्यात पराभूत झाला, तर इंग्लंडचा संघ सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर पडेल.

दरम्यान या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने मोठं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शच्या अडचणीत वाढ झाली आहे. हेजलवूडने असं म्हटलंय की, इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ हा सामना हलक्यात घेऊ शकतो. यासह संघातील काही खेळाडूंना विश्रांती देखील दिली जाऊ शकते. हेजलवूडने हे वक्तव्य करताच आयसीसी अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले आहे.

AUS vs SCO, Mitchell Marsh: स्कॉटलंडकडून पराभव झाला तर मिचेल मार्शवर लागणार २ सामन्यांचा बॅन! वाचा काय आहे कारण?
IND vs USA,Super 8: USA ला नमवत टीम इंडियाची विजयाची हॅट्ट्रिक! सुपर ८ मध्ये या संघांसोबत होणार सामना

आयसीसी करु शकते कारवाई

ऑस्ट्रेलियाने सुपर ८ चं तिकीट कन्फर्म केलं आहे. तर इंग्लंडला सुपर ८ मध्ये जाण्यासाठी इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. जर ऑस्ट्रेलियाने हलक्यात घेऊन हा सामना गमावला, तर इंग्लंडचा संघ सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर पडणार आहे. असं झाल्यास ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारावर २ सामने खेळण्यावर बंदी घातली जाऊ शकते.

AUS vs SCO, Mitchell Marsh: स्कॉटलंडकडून पराभव झाला तर मिचेल मार्शवर लागणार २ सामन्यांचा बॅन! वाचा काय आहे कारण?
IND vs PAK: रिझवानचा जीव थोडक्यात बचावला; सिराजच्या त्या बॉलवर नेमकं काय घडलं? - Video

आयसीसीने मार्शवर आयसीसीच्या आचार संहितेच्या अनुच्छेद २.११ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जर कुठल्याही संघाने गुणतालिकेची स्थिती बदलण्यासाठी मुद्दाम सामना गमावला, तर त्याच्यावर या कलमानुसार कारवाई केली जाते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना गमावला,तर याचा मिचेल मार्शला मोठा फटका बसू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com